पचनसंस्थेचे सर्व आजार स्वयंपूर्ण उपचारांनी बरे होऊ शकतात.

हृदय जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात. पण ह्याच पोटात जे जातं, त्यातूनच सर्व आजारही उद्भवतात हे आपण लक्षात यायला घ्यावं. पचनसंस्था ही शरीरातली एक महत्वाची संस्था. तोंड, अन्ननलिका, छोटे आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार ही या पचनसंस्थेची अंगे. जेव्हां आपण खातो तेव्हां प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा असं आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र सांगतं. या चावण्यामुळेच पचनक्रिया सोपी होऊन शरीरामध्ये रस व सप्तधातू तयार होतात आणि न पचलेले अन्न विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकले जाते.

आपल्याला भूक लागते, तेव्हां पोटात आग पडते हे तर आपल्याला ठाऊकच आहे. हीच उष्णता पचनक्रिया घडवून आणते. पण उष्णतेचे प्रमाण कमी/जास्त झाले की, तोंडाच्या अल्सरपासून ते मूळव्याधीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात. जेव्हां शरीरातली उष्णता म्हणजेच अग्नीचे नियंत्रण मणिपूर चक्राद्वारे केले जाते. त्यामुळेच पचनसंस्थेच्या कोणत्याही आजारासाठी निरामयमध्ये प्रामुख्याने मणिपूर चक्रावर उपचार करून ते पुन्हा संतुलित केले जाते. पण याचबरोबर आपला आहार आणि आहाराच्या वेळा, आपल्यामध्ये असणारे ताणतणाव या गोष्टीही पाहाव्या लागतात. आजच्या काळात कामाचे ताण इतके वाढलेत की, माणसांना धड जेवायलाही वेळ नाही. त्यामध्येही आघाडीवर असणारे क्षेत्र म्हणजे आय.टी. क्षेत्र. आय.टी.मध्ये ऐटीत काम करणार्‍या आजच्या तरूण पिढीला पित्ताचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो.

अशीच एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली अनुराधा भावसार. तिला हायपर अ‍ॅसिडिटीचा प्रचंड त्रास होता. तो त्रास इतका वाढत गेला की, जेवण तर सोडा, साधं पाणी पिणंही तिला मुश्कील झालं होतं. रात्री अंथरूणावर ती आडवं पडू शकत नसे. कारण शरीर आडवं झालं की, पोटातील सर्व अ‍ॅसिड्स तोंडामध्ये येतात. यावर अनुराधाने एक महिना अ‍ॅलोपॅथीच्या गोळ्या घेऊन पाहिल्या. पण काहीच फरक पडेना. या त्रासामुळे ऑफिसमध्ये काम करणं अवघड होऊन बसलं होतं. अशा परिस्थितीत आईच्या सांगण्यावरून अनुराधा निरामयमध्ये आली. स्वयंपूर्ण उपचारांनी तिला सुरूवातीलाच फरक जाणवू लागला. पुढे दोन महिने तिने नित्यनेमाने उपचार घेतले आणि तिची हायपर अ‍ॅसिडिटी कायमची गेली. तिला आजतागायत कोणताही त्रास झालेला नाही. यासाठी आय.टी.मध्ये काम करणार्‍या सर्वांना आम्ही साळीच्या लाह्या, धन्याजिर्‍याचं पाणी, भाताची पेज खाण्यास सांगतो. उजव्या कानात कापूस ठेवण्याचा सल्ला देतो. बदलत्या शिफ्टमध्ये काम करणार्‍यांनी तर रात्रीच्या आहारात दही-ताक घ्यायलाच हवे. याचबरोबर स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास आपला ताणतणावही कमी होतच असतो.

आता तुम्ही म्हणाल, ही अ‍ॅसिडिटी किंवा पित्त होतं कशामुळे? त्यासाठी जंक फूड, अनियिमित वेळा, ताणतणाव या गोष्टींबरोबर आपण जे अन्न खातो तेही तितकंच जबाबदार असतं. हल्ली रासायनिक प्रक्रिया करून अन्नधान्य निर्माण केलं जातं. म्हणजे आपण घरात आणलेला किराणा किंवा भाजीपाला ह्यामध्ये त्यातील रसायनांमुळे आधीच उष्णता असते. हेच अन्न पोटात गेल्यावर पोटातील उष्णता आणखीनच वाढते आणि पित्ताचा त्रास सुरू होतो. याउलट जे लोक एसीमध्ये काम करतात, त्यांचे शरीर उष्णता बाहेर टाकत असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये कमी उष्णतेचा त्रास जाणवतो. अशावेळी डाव्या कानात कापसाचा बोळा ठेवण्याचा सल्ला आम्ही देतो.

आपल्याकडे अ‍ॅसेडिटीसाठी गोळी घेतली जाते. पण ही गोळी तितकीशी प्रभावी तर ठरत नाही उलट शरीरातील पित्त आणखीनच वाढवत असते. त्यामुळे पित्ताचा त्रास इतका वाढत जातो की साधं पाणी प्यायलं तर अ‍ॅसिडिटी उफाळून येते. हे आजार कायमचे घालविण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार घ्यायला हवेत. कारण आम्ही शरीराची ही प्रवृत्ती, ही टेंडन्सी मोडतो. त्यासाठी अग्नी, जल, पृथ्वी आणि वायू तत्वांवर उपचार करून ही तत्वे संतुलित करतो. पित्ताचे तसे अनेक प्रकार आहेत. आता आपण पाहिले ते उष्ण पित्त. तसेच शीत पित्त देखील असते. ह्या शीत पित्तामुळे शरीरावर गांधी उठणे, पुरळ उठणे, त्वचा लाल होणे किंवा खाज सुटणे असे त्रासही होत असतात. एकूणात पित्ताचा त्रास जर सुरू झाला तर तो वाढत जाणार हे निश्‍चित ! जर वरच्या बाजूला पित्त वाढले तर अन्ननलिकेत समस्या, जळजळ, तोंडातला अल्सर आणि खालच्या भागात पित्त वाढले तर आतड्याला भोकं पडण्यापासून ते मूळव्याधीपर्यंत विविध त्रास जाणवू लागतात.

ह्यावर कोणतीही गोळी घ्या, ती तात्पुरतीच परिणाम करते. मुळात हा आजार मुळापासून घालवायला हवा. त्यासाठीच स्वयंपूर्ण उपचार हा योग्य पर्याय आहे. एखादे झाड तोडायचे असेल तर त्याची प्रत्येक फांदी, प्रत्येक मूळ छाटावे लागते. थोडं जरी शिल्लक राहिलं तर तो वृक्ष पुन्हा फोफावू लागतो. आजाराचंही असंच आहे. यासाठीच त्याची संपूर्ण मूळं छाटल्याशिवाय उपचार बंद करू नयेत असं आम्ही आग्रहानं सांगतो. जेव्हां तुमच्या ऊर्जा शरीरासोबतच स्थूल शरीरही सुदृढ होते, तेव्हांच उपचार बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतो आणि मग त्या रूग्णाला आयुष्यात पुन्हा तो त्रास उद्भवत नाही. पचन संस्थेच्या बाबतीतही आम्ही अशाच पध्दतीने स्वयंपूर्ण उपचार करतो. कारण तुमच्या आयुष्यातून कोणतीही गोळी बंद व्हावी आणि तुमची पचनसंस्था एवढी सशक्त व्हावी की, पचन अधिक चांगले होईल आणि निरोगी आयुष्य आनंदात जगता येईल.

पचनसंस्थेचे कोणतेही त्रास जाणवणार्‍यांनी हा व्हिडीओ आवर्जून पाहावा.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!