तरूण पिढीच्या वंध्यत्वामध्ये ‘गुड न्यूज’ देणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती!

पूर्वीच्या काळी 26-27 वयोगटातल्या बायकांना 2 मुलं झालेली असायची. आता 26-27 वय झाल्यावरच मुलं-मुली लग्नाचा विचार करू लागले आहेत. ‘कालाय तस्मै नमः’ असं म्हणत ह्या तरूण पिढीच्या यशस्वी करिअरकडे पाहायला लागलो तर भविष्यात हीच कपल्स आपल्या स्वतःच्या मुलासाठी आटोकाट प्रयत्न करतानाही दिसतात. आत्ताच्या पिढीमध्ये गर्भधारणेमध्ये येणार्‍या समस्या किंवा वंध्यत्व ह्याचा वयाशी काही संबंध असेल का? याचाही विचार आजच्या तरूण पिढीने करायला हवं.

देवानं दिलेलं शरीर हे त्या त्या वयानुसार विकसित होत असतं. म्हणूनच ‘योग्य वयात योग्य गोष्टी’ होणं सामाजिक आणि वैद्यकीय दृष्टीकोनातून केव्हांही चांगलं ! साधारणतः विशी-तिशीचा काळ हा शरीरासाठी ऐन तारूण्याच्या बहरातला. ह्या काळात शरीरातले सर्वच अवयव अगदी प्रजननसंस्था सुध्दा सर्वोत्कृष्टरित्या कार्यरत असते. पण याच काळात तरूण मंडळी आपलं करिअर घडविण्यात मग्न असतात. सततची टेन्शन, कष्ट ह्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक झीज होत असते. त्यातून पोषक आहार, पुरेशी झोप, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टींकडे जरा कानाडोळाच केला जातो. आपण कितीही दुर्लक्ष केलं तरी ह्याचा दुष्परिणाम आपल्या अवयवांवर होत असतं. आणि जेव्हां पुढे लग्न झाल्यावरही मूल होत नाही हे कळल्यावर, आपलं ह्या अवयवांकडे लक्ष जातं.

तुम्हांला आश्‍चर्य वाटेल पण, तिशीनंतर लग्न म्हणजे अवयव खूप थकलेले असतात. त्यातही तरूण पिढी एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ घेत असते. म्हणजे लगेच मूल नको, ह्यासाठी गोळ्या घेतल्या जातात, अगदी पाळी पुढं ढकलण्यासाठीही गोळ्यांचा सर्रास वापर होताना दिसतो. पण ह्यामुळे आपलं शरीरचक्र बिघडत जातं हे मात्र आपल्या ध्यानात येत नाही. पुढे हीच मंडळी जेव्हां वंध्यत्व निवारण्यासाठी निरामयमध्ये येतात, तेव्हां सर्वात आधी आम्ही हे बिघडलेले शरीरचक्र पुन्हा जागेवर आणण्यासाठी उपचार सुरू करतो. शरीरातील पंचतत्वांचे असंतुलन दूर करतो. जे अनावश्यक साचलेलं आहे ते बाहेर काढतो आणि जे कमी आहे ते पुरवतो. त्यामुळे आमच्याकडे मुलासाठी येणार्‍या अगदी चाळीशीतल्या बायकांनाही ह्या स्वयंपूर्ण उपचारांद्वारे अपत्यप्राप्ती झालेली आहे, हे मला अभिमानानं आणि आनंदानं इथं सांगावंसं वाटतं.

समृध्दी शहा ह्या महिलेला चाळीशीत गर्भधारणा झाली तेव्हां डॉक्टरांनी हे मूल अ‍ॅबनॉर्मल असण्याची शक्यता वर्तवली होती आणि त्यासाठी गर्भजल परीक्षाही सुचवली होती. पण ह्या बाईंच्या सासू निरामयमध्ये यायच्या. त्यांच्यात पडलेला फरक पाहून समृध्दी शहांचाही आमच्यावर विश्‍वास होता. त्याच विश्‍वासाने त्या जेव्हां निरामयमध्ये आल्या तेव्हां डॉ. योगेश चांदोरकरांनी त्यांना गर्भजल परीक्षा अजिबात करू नका असे सांगितले. तुमच्या कितीही समस्या असोत, स्वयंपूर्ण उपचारांद्वारे आपण दूर करू. ह्या बाईंनी डॉ. योगेश ह्यांच्या म्हणण्यावर 100% विश्‍वास ठेवला. संपूर्ण गरोदरपणात कुठलंही औषध न घेता त्या केवळ स्वयंपूर्ण उपचार घेत राहिल्या. 9 महिन्यानंतर त्यांनी एका गोंडस कन्येला जन्म दिला, हे पाहून मॉडर्न सायन्सचे डॉक्टर्सही आश्‍चर्यचकित झाले. बरं, ही मुलगी अ‍ॅबनॉर्मल तर नाहीच तर इतर मुलांपेक्षा जरा जास्त स्मार्ट व विलक्षण बुध्दिमत्तेची आहे.

हे सगळं स्वयंपूर्ण उपचारांद्वारे घडतं. अगदी गरोदरपणातले ब्लड प्रेशर, शुगरचे चढ-उतारही आश्‍चर्यजनक रीतीने नियंत्रणात आलेले तुम्ही पाहू शकता. इतरांचे अनुभव सांगण्यापेक्षा मी माझा स्वतःचा अनुभव सांगेन. वयाच्या 33 व्या वर्षी माझी पाळी पूर्णपणे थांबली. ‘प्री-मेनोपॉज’चा हा काळ. त्याचवेळी आम्ही ‘निरामय’ सुरू केलेले. त्यामुळे कामाचा व्याप इतका होता की मला ते वरदानच वाटले. अशी 5-6 वर्षे आम्ही नवरा-बायको दोघेही निरामयच्या कामात अक्षरशः बुडून गेलो. पुण्यात सुरू झालेलं निरामय हळूहळू कोल्हापूर, मुंबई असं वाढत गेलं. माझ्याही फेर्‍याही वाढत गेल्या. नंतर ‘निरामय’ आता सेट झालंय तर आपणही मुलाचा चान्स घेऊयात का? असा स्त्रीसुलभ विचार माझ्याही मनात डोकावला.
अर्थात मॉडर्न सायन्सकडे ‘प्री-मेनोपॉज’ला औषध नव्हतंच. मग मी स्वतः माझे पती डॉ. योगेश ह्यांच्याकडून स्वयंपूर्ण उपचार घ्यायला सुरूवात केली. 3 आठवड्यातच आम्हांला आमची ‘गुड न्यूज’ कळाली आणि पुढे योग्य ती काळजी आणि स्वयंपूर्ण उपचार घेऊन वयाच्या 41व्या वर्षी मी एका गुटगुटीत मुलाची आई झाले.

ह्या काळात आम्ही बाहेरच्या डॉक्टर्सकडेही गेलो. तेव्हां मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. ती म्हणजे, मॉडर्न सायन्सचे डॉक्टर हे रूग्णांना आधीच घाबरवून टाकतात. गर्भधारणेपासून बाळंतपणापर्यंत तुमच्या केसमध्ये किती गुंतागुंत आहे, याचा जणू ते पाढा वाचतातच. माझं तर त्यावर स्पष्ट म्हणणं आहे, डॉक्टर तुम्ही आहात, प्रॉब्लेम्स काय सांगता? याचं सोल्यूशन सांगा आणि मी तुम्हांला यातून बाहेर काढेन असा आत्मविश्‍वास द्या. अर्थात असं करणारा एखादाच विरळा डॉक्टर तुम्हांला भेटेल. पण निरामयमध्ये तुम्ही आलात तर आमच्याकडचे प्रत्येक डॉक्टर तुम्हांला हेच सांगतील की, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पूर्ण बरे होणार आहात. तुम्हांला सांगते, हे वाक्य इतकं आश्‍वासक ठरतं, आलेल्या पेशंटमध्ये जागेवर बारा हत्तीचं बळ आम्हांला दिसू लागतं.

त्यामुळे तुमचं लग्न कितीही उशीरा झालेलं असो, तुमच्याकडून शरीराची हेळसांड झालेली असो आणि तरीही तुम्हांला गर्भधारणा हवी असेल तर संपूर्ण विश्‍वासाने तुम्ही निरामयमध्ये या आणि स्वयंपूर्ण उपचारांद्वारे आई-बाबा होण्याचा आनंद घ्या. अर्थात आम्ही देव नाही. पण तुमच्या प्रजनन अवयवांना ताकद देण्याची आणि शरीरातले दोष दूर करण्याची क्षमता आमच्या स्वयंपूर्ण उपचारांमध्ये निश्‍चितच आहे.

उशीरा गर्भधारणा करू इच्छिणार्‍यांना मार्गदर्शन करणारा हा व्हिडीओ आवर्जून पाहा.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!