जुलाब हा आजारच असा आहे की, ज्याचं नाव जरी काढलं तरी माणसाच्या अंगातलं त्राण निघून जातं. ह्या जुलाबाचा संबंध आपल्या पचनसंस्थेशी आहे. आपण खालेल्ल्या अन्नाचा लहान आतडयामध्ये अन्नरस तयार होतो आणि न पचलेल्या अन्नाची मोठ्या आतड्यात विष्ठा निर्माण होते. ह्या दोन्ही आतड्यांवर कोणत्याही कारणाने ताण आणला किंवा त्यांची कार्यक्षमता खालावली की मग पचनाशी संबंधित वेगवेगळे त्रास सुरू होतात. आता हे जुलाब एक-दोनदा झाले तर हरकत नाही. पण काही लोकांच्या बाबतीत जुलाब वारंवार होऊ लागतात. जेवलं की लगेच शौचास पळावे लागते. ह्या जुलाबाचा त्रास इतका वाढतो की माणसाला अक्षरशः झोपून रहावे लागते. कारण अंगात ताकद अशी उरलेलीच नसते.
असा जुलाबाचा त्रास असणारी व्यक्ती साधी उभी राहू शकत नाही तर निरामयमध्ये केव्हां येणार आणि उपचार कसे घेणार? अशावेळी आम्ही रूग्णाचा फोटो मागवून घेतो आणि उपचार सुरू करतो. ह्या स्थितीत रूग्णाने शवासनासारख्या स्थितीमध्ये, अंग शिथील सोडून उपचार घ्यायचे असतात. सुरूवातीला आम्हांला 2-2 वेळा ट्रीटमेंट द्यावी लागते. त्यानंतर त्या रूग्णाला हळूहळू फरक जाणवू लागतो. भुकेची भावना निर्माण होऊ लागते. ह्याचा अर्थ शरीराला आता अन्न हवंय असा असतो. अशावेळी आम्ही केवळ पातळ पदार्थ द्यायला सांगतो. ते पचू लागलं की थोडं घन. तेही पचू लागलं की हळूहळू रोजचा आहार सुरू करायला सांगतो.
काहीवेळेला काय होतं की, जुलाबातून उठलेला माणूस लगेच संपूर्ण आहार घ्यायला लागतो. इतके दिवस काहीच खाल्लेलं नसतं, त्यामुळे तशी इच्छा होणं स्वाभाविकच आहे. पण असं करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यातून पुन्हा त्रास सुरू होऊ शकतो. कारण शरीर अजून त्याच्या पूर्वस्थितीला आलेलं नसतं. माणसानं आपल्या शरीराची नीट काळजी घेणं अपेक्षितच आहे. पण निदान शरीरावर आणि पोटावर अत्याचार करू नये असे आम्ही आवर्जून सांगतो.
पोटाचा आणखी एक त्रास म्हणजे बध्दकोष्ठता. ह्यामध्ये शौचाला साफ होत नाही. सहज होत नाही. विष्ठा ही अत्यंत कडक झालेली असते. शौच करतेवेळी कुंथावे लागते, जोर लावावा लागतो. त्यामुळे गुद्द्वाराच्या आतील त्वचेला व भागांना इजा होऊन फिशर सारखे आजारही उत्पन्न होतात. ही बध्दकोष्ठता मुख्यतः पचनाची कमकुवत शक्ती आणि उष्णतेमुळे होते. ह्यामध्ये मोठ्या आतड्याची शक्ती कमी झाल्यामुळे आकुंचन-प्रसरण सारख्या क्रिया नैसर्गिकरित्या होत नाहीत. विष्ठा मोठ्या आतड्यातच पडून राहिल्यामुळे ती घट्ट होते.
असाच त्रास 5-6 वर्षांपासून असणारे मंगलमूर्ती देव, हे गृहस्थ अॅलोपॅथी व होमिओपॅथीच्या औषधांनी फरक न पडल्यामुळे निरामयमध्ये आले. त्यांचा आहार सात्विक असूनही अपचनाचा त्रास होता. आम्ही त्यांना ट्रीटमेंट सुरू करताना औषधंही सुरू ठेवायला सांगितली. पुढे जसजसा फरक पडत गेला तसतशी औषधंही हळूहळू बंद झाली. नंतर ट्रीटमेंटही हळूहळू कमी करत करत त्यांची ट्रीटमेंट पूर्ण बंद करण्यात आली. कारण त्यांचा त्रास पूर्णपणे गेलेला होता.
निरामयमध्ये आल्यावर आम्ही रूग्णांना त्यांची सुरू असलेली औषधे लगेच बंद करायला सांगत नाही. ह्या स्थितीत औषधांचा जरी साईड इफेक्ट्स होत असला तरी औषधेही शरीराला आधारही देत असतात. स्वयंपूर्ण उपचारांनी साईड इफेक्ट्स दूर होऊ शकतात. पण शरीरचा आधार लगेच काढून घेणं योग्य नसतं. जसजसे स्वयंपूर्ण उपचार सुरू होतात. तसतशी शरीराला ताकद मिळत जाते. अवयवांच्या कार्यक्षमतेत फरक पडू लागतो. तेव्हां रूग्ण आपल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ती औषधे घेणे बंद करतात. आम्ही तर रूग्णांना स्पष्ट सांगतो, तुमची औषधं सुरू ठेवा आणि ट्रीटमेंटही घ्या. ट्रीटमेंट सुरू झाल्यापासून 15 दिवसात तुम्हांला फरक जाणवेल आणि तो बदल औषधांमुळे की निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारांमुळे, हे तुमचं तुम्हांलाच समजेल.
मोठ्या आतड्याचा आणखी एक असाध्य आजार म्हणजे ‘इरिटेबल बाऊल सिंड्रोम’ म्हणजेच मोठ्या आतड्याचे वेड्यासारखे वागणे. या आजारात आज जो पदार्थ खाल्ला तोच उद्या खाल्ला तर त्रास होतो. यावर मॉडर्न सायन्सकडे कोणतेही औषध नाही. कारण हा आजार मनातील अनामिक भीतीमुळे किंवा अतिताणामुळे शरीरावर झालेला दुष्परिणाम आहे. मॉडर्न सायन्स फक्त शरीरावर काम करतं. त्यामुळे ह्या काल्पनिक विचारांवर त्यांच्याकडे औषध एकच ते म्हणजे गुंगीचं !
हा आजार झालेल्या सुनंदा हातवळणे ह्या आजी निरामयमध्ये आल्या. तेव्हां त्यांना खूप जुलाब व्हायचे. आम्ही त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. अतिविचारांची, भयाची किंवा ताणाची ऊर्जा शरीरात जिथे जिथे साठली होती, तिथून ती बाहेर काढली. त्यांचे अनाहतचक्र स्वच्छ केले आणि त्याचा परिणाम काही दिवसातच दिसू लागला. हळूहळू आजींचा त्रासही कमी कमी होत पूर्ण गेला आणि ट्रीटमेंटही थांबली.
शरीर आणि मनाचा संबंध खूप जवळचा आहे. आपलं आयुष्य ताणतणावाचं आहे. डोक्यातील विचारांचा, ताणांचा शरीरावर दुष्परिणाम होत असतो. ती अनावश्यक ऊर्जा शरीरामध्ये विनाकारण साचू लागते आणि त्यातूनच आजार निर्माण होत असतात. त्यामुळे एखादा आजार मुळापासून दूर करायचा असेल तर स्वयंपूर्ण उपचारांशिवाय दुसरा प्रभावी पर्याय नाही. हा पर्याय इतका प्रभावी आहे की, तुम्ही एका आजारासाठी या, स्वयंपूर्ण उपचार पध्दती तुमचे सर्व आजार दूर करते.
तेव्हां ताण घेऊ नका. निश्चिंत मनाने निरामयमध्ये या आणि निरामय आयुष्याचा आनंद घ्या.
जुलाब व बध्दकोष्ठतेसंबंधी मार्गदर्शन करणारा हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा.