समुपदेशन

5

बहुतांशी रोगाचे मूळ कारण मनातील अयोग्य विचार हेच असते. जोपर्यंत मन:शुद्धी होत नाही, तोपर्यंत शरीराला जडलेला आजार समूळ नष्ट होत नाही. मन व शरीर परस्परक्रिया व प्रतिक्रिया करत असतात, हे सर्वमान्य तथ्य आहे. मानसिक व्याधींमुळे शारीरिक रोग उत्पन्न होतात, तसेच याउलटही होते. जवळजवळ सर्व रोगांचे मूळ मन हेच आहे. ‘मला सर्दी होऊ शकते किंवा अमुक एक व्याधी होऊ शकते’, असे आपले विचार आपल्या शरीराला त्या रोगजंतूंच्या स्वागतासाठी तयार करत असते.

आपले मन विश्वमनचाच एक अंश आहे. त्यामुळे कोणताही संकल्प (दृढ विचार) मनात उत्पन्न झाला की क्षणार्धात तो विेश्वभर संचार करीत असतो. आपण उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेली कृती, मनात आलेला प्रत्येक विचार लगेच विेश्वावकाशात चित्रित केला जातो आणि म्हणूनच लक्षावधी मैल दूर असणार्‍या माणसांचे विकार केवळ प्रार्थनेने दूर करता येतात. संकल्प ही प्रचंड स्थिर, चल जगताला व्यापून उरणारी शक्ती आहे. संकल्प जितका बलवान, तितकी तुमची प्रार्थना सफल होते.

आपल्या संस्कृतीने प्रत्येक घटनेला, वस्तूला पावित्र्य, मांगल्य दिले. सुंदर प्रथा शिकविल्या. सुसंस्कृत व कृतज्ञ बुद्धीने सर्वांकडे पाहायला शिकविले. या सगळ्यातून विश्वास व श्रद्धेमुळे प्रचंड मनोधैर्य माणसात निर्माण होत असे. यामुळे संकटांचा सामना माणूस सहजपणे करू शकत असे. आज मात्र चहाच्या पेल्यातील वादळानेसुद्धा माणसे कोलमडतात. कोणताही रोग हा फक्त शरीरातील बिघाड नसून मनाचा कमकुवतपणा तसेच चैतन्यशक्तीचा र्‍हास याचाच परिपाक असतो.

स्वयंपूर्ण उपचारपद्धतीमध्ये रुग्णाच्या मानसिकतेचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार मनाची सकारात्मकता वाढविण्यासाठी व खोलवर गेलेल्या दुःख भावना समूळ नष्ट करण्यासाठी त्याला समुपदेशन केले जाते. यामुळे मनाची ताकद वाढून भविष्यात कोणतेही संकट अथवा दुःख सहन करणे व त्यास खंबीरपणे तोंड देणे सहज शक्य होते.

निसर्गोपचार
संपूर्ण सृष्टी (निसर्ग) ही पंचतत्त्वांपासून बनलेली आहे. मनुष्यप्राणी हाही निसर्गाचाच एक Read More
मुद्रा शास्त्र
आपल्या हाताची पाच बोटे पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व करत असतात. अग्नितत्त्वाचे प्रतिनिधित्व Read More
अक्षरब्रह्म
अक्षरब्रह्म किंवा नादब्रह्म हा आणखी एक महत्त्वपूर्ण विषय आहे. आपल्या वर्णालेतील Read More
नाडी/चक्र शुद्धी
स्वयंपूर्ण उपचारपद्धतीमधील हे एक महत्त्वाचे अंग असून याद्वारे संपूर्ण दोषनिवारण केले जाऊ Read More