निसर्गोपचार

संपूर्ण सृष्टी (निसर्ग) ही पंचतत्त्वांपासून बनलेली आहे. मनुष्यप्राणी हाही निसर्गाचाच एक भाग आहे. आपले शरीरही याच पंचतत्त्वांपासून बनलेले असून या पाचही तत्त्वांचा समतोल आपणास सुदृढ व चैतन्यमय ठेवतो. जेव्हा यातील एखादे तत्त्व बिघडते, म्हणजेच हा समतोल ढळतो, तेव्हा आपल्या शरीरात आजार किंवा व्याधीचा शिरकाव होतो.

पंचतत्त्व : आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी ही पंचतत्त्वे असून, या संपूर्ण विेशाची उत्पत्ती याच पाच तत्त्वांतून झालेली आहे. याचे स्थूल गुणधर्म अनुक्रमे आकारमान, गतिशीलता, उष्णता, प्रवाहिता व स्थिरता हे असून सूक्ष्म गुणधर्म शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे आहेत.

शब्द तन्मात्रेपासून आकाश निर्माण होते. शब्द व स्पर्श या दोन तन्मात्रांपासून वायू निर्माण होतो. शब्द, स्पर्श व रूप हे तेजाचे म्हणजेच अग्नीचे गुण आहेत. शब्द, स्पर्श, रूप व रस हे जलाचे गुण आहेत आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पृथ्वीचे गुणधर्म आहेत. माणसाचे शरीरही याच पंचतत्त्वांनी बनलेले आहे. आपल्या शरीरातील कान, त्वचा, डोळे, जीभ व नाक ही वरील पंचतत्त्वांशी अनुक्रमे संबंधित आहेत.

आपल्या शरीरातील अस्थी, मांस, त्वचा, नाडी व रोग हे पृथ्वीतत्त्वाच्या अधीन आहेत. शुक्र, रक्त, लाळ, मूत्र, स्वेद हे जलतत्त्वाच्या अधीन आहेत तर क्षुधा, तृष्णा, आळस, निद्रा व मैथुन हे अग्नितत्त्वाच्या अधीन असतात. वायुतत्त्वाच्या अधीन चलन-वलन, आकुंचन, प्रसरण व निरोधन असते तसेच काम, क्रोध, लोभ, मोह व भय हे आकाशतत्त्वाच्या अधीन असतात. ही पंचतत्त्वे आपल्या शरीरातील सूक्ष्म नाड्यांमधून सतत प्रवाहित होत असतात. योग्य आहार, विहार, विचार आणि व्यायाम माणसाला चिरकाल निरोगी व आनंदी ठेवतात.

स्वयंपूर्ण उपचारांतर्गत रुग्णाच्या प्रकृतीमानानुसार व आजारांनुसार आहारातील बदल सुचविले जातात, गरजेनुसार काही व्यायाम सांगितले जातात. ज्याद्वारे पंचतत्त्वांचे संतुलन साधण्यास मदत होते.

मुद्रा शास्त्र
आपल्या हाताची पाच बोटे पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व करत असतात. अग्नितत्त्वाचे प्रतिनिधित्व Read More
अक्षरब्रह्म
अक्षरब्रह्म किंवा नादब्रह्म हा आणखी एक महत्त्वपूर्ण विषय आहे. आपल्या वर्णालेतील Read More
समुपदेशन
बहुतांशी रोगाचे मूळ कारण मनातील अयोग्य विचार हेच असते. जोपर्यंत मन:शुद्धी होत नाही, Read More
नाडी/चक्र शुद्धी
स्वयंपूर्ण उपचारपद्धतीमधील हे एक महत्त्वाचे अंग असून याद्वारे संपूर्ण दोषनिवारण केले जाऊ Read More

अनुभव

परस्वाधीनता संपली - श्री. जयदीप चांदवाणी
मला सिव्हिअर फ्रोजन शोल्डरचा त्रास होता. इतका की मला शर्टच्या बाहीमध्ये हात घालण्यासाठीही मदतीची गरज पडत होती. उजवा खांदा पूर्णपणे आखडलेला होता. तिथे प्रचंड वेदना होत्या. उजवा हात असल्यामुळे सर्वच बाबींमध्ये खूपच बंधने येत होती. औषधे सुरू होतीच. पण म्हणावा असा गुण येत नव्हता. त्यातच सकाळ मुक्तपीठ मध्ये मराठे आजींचा अनुभव वाचनात आला. काहीतरी वेगळी उपचारपद्धती होती. म्हटलं जाऊन तर बघू. निरामयमध्ये मी आलो तो दिवस होता 4 मे 2010. त्या दिवसापासून ट्रीटमेंट सुरू झाली. तीनच महिन्यात बराच फरक पडला. दुखणं पूर्ण थांबलं. हाताची मुव्हमेंटही व्यवस्थित होऊ लागली. पुढेही ट्रीटमेंट सुरू ठेवली व सहा महिन्यात मी पूर्ण बरा झालो व माझी मी गाडी देखील चालवू लागलो. …..