समुपदेशनाने मनो-शारीरिक आजारातुन बाहेर
– अनामिक प्रतिक्रिया

फेब्रुवारी 2004मध्ये एका छोटेखानी अपघातात माझ्या डाव्या गुडघ्याची लिगामेंट तुटली. तीन महिन्यांनंतर लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी केली. परंतु मनात नेहमी शंका-कुशंका निर्माण होतच होत्या. असे का झाले, पुढे आपले काय होणार वगैरे… दरम्यानच्या काळात तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ले झाले, सर्व पॅथींची औषधेही घेतली. परंतु फरक जाणवत नव्हता. सतत एका जागी बसून राहणे अवघड होत होते, प्रचंड स्टिफनेस आला होता आणि त्यामुळेच मला नोकरीही सोडावी लागली.
दरम्यान सकाळमध्ये ‘निरामय’संदर्भातील लेख वाचला. आई-वडिलांच्या सांगण्यावरून काहीशा अनिच्छेनेच मी तेथे गेलो. पण त्यावेळी घेतलेल्या निर्णयाचा आता फायदा झाल्याचे लक्षात येत आहे. तेथील डॉक्टरांनी मला उत्तम प्रकारे समुपदेशन केले. मला जडलेला आजार हा मनो-शारीरिक होता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे माझ्या लक्षात आले.
हळूहळू माझ्यात सुधारणा होत गेली. नजीकच्या काळात याच उपचाराच्या आधारे मी पूर्णपणे बरा होऊन पुन्हा नोकरीवर रुजू होईन, अशी मला खात्री वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *