सहस्रार चक्र

सहस्रार चक्र ब्रह्मरंध्र म्हणजेच टाळूवर असते. हे प्राणशक्तीचे प्रवेश केंद्र आहे. याचा रंग जांभळा आहे.

सहस्रार चक्राकडे मेंदूचे नियंत्रण तसेच पिनियल ग्रंथींचे नियंत्रण असते. मूळ प्रेममय स्फुरण व ऐक्याचा भाव या चक्रामुळे येतो.

सहस्रार चक्र हे ब्रह्मजागृतीचे केंद्र असून, परमात्म्याचे, परमतत्त्वाचे ज्ञान येथे होते. अनुभूती, साक्षात्कार या चक्रामुळे घडतात. हे विश्वप्रेमाचे केंद्र असून, ज्याचे सहस्रार चक्र सक्षम असते ती व्यक्ती परोपकारी, आत्मज्ञानी असते.

ज्यावेळी सहस्रार चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न होतात. तेव्हा, मेंदू व पिनियल ग्रंथींशी संबंधित शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

तसेच,

असमाधानी वृत्ती व मनःशांतीचा अभाव अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे सहस्रार चक्रातील दोषनिवारण करून ते सबल व संतुलित केले जाते, ज्यामुळे वरील सर्व आजारांचे निर्मुलन केले जाऊ शकते. ज्यामुळे मनःस्वास्थ व समाधान तर मिळतेच पण त्याच बरोबर ज्ञानाची दारे उघडण्यास मदत होते. आपण बरीच पुस्तके वाचतो, पुस्तकांतून माहिती मिळते. पण आकलन होणे, ज्ञान मिळणे, हे सहस्रार चक्रावर अवलंबून असते.