टीम निरामय

about-header

सर्वे सन्तु निरामयः।

काही वर्षांपूर्वीचा विचार केला तर आम्ही या क्षेत्रात येऊ असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु 2001 मध्ये माझ्या आईला हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्यामुळे इस्पितळात दाखल केले. 90% हार्ट ब्लॉकेज असल्यामुळे डॉक्टरांनी लगेच बायपास सर्जरी करण्यास सांगितले; अन्यथा ‘30 दिवसांपेक्षा जास्त त्या जगणार नाहीत’ असे त्यांचे मत होते. माझ्या आईचा निसर्गोपचारावर प्रगाढ विश्वास होता, त्यामुळे तिने या सर्जरीस नकार दिला व संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगसाधना व आवश्यक औषधोपचार यांच्या साहाय्याने ती पुढे 10 वर्षे अत्यंत निरोगी व आनंदी आयुष्य जगली. असेच निरोगी जीवन सर्वांना मिळावे अशी तिची मनापासून इच्छा होती. तिच्याच इच्छेमुळे मला प्रेरणा मिळाली आणि मी व माझी पत्नी आज ‘निरामय’च्या माध्यमातून आपल्यासमोर उभे आहोत.

समाजात वावरताना आजूबाजूला अनेक पीडित लोक भेटतात. प्रत्येकाचा आजार वेगळा असतो, काहींच्या आजाराचे स्वरूप छोटे असते तर काहींना मोठ्या व्याधींनी ग्रासलेले असते. परंतु गेल्या काही वर्षांत निसर्गशास्त्र, योगशास्त्र आणि त्यासंबंधित विषयांचा सखोल अभ्यास केल्यावर आमच्या असे लक्षात आले की, आजाराचे स्वरूप जरी लहान-मोठे असले तरी त्याचे मूळ हे शरीर-मन-ऊर्जा या त्रिसूत्रीमध्येच दडलेले असते. आपल्या मनातील सकारात्मक विचार आणि शरीरातील ऊर्जेचा योग्य समतोल या गोष्टींच्या आधारे कोणत्याही आजारावर अगदी सहज मात करता येऊ शकते. याच विचारातून जानेवारी 2010 ला ‘निरामय कन्सल्टन्सी ’ ची आम्ही सुरुवात केली.

उद्दिष्ट एकच होतं, ते म्हणजे आनंदी आणि निरोगी समाज घडविण्याचं.

विना औषध, विना स्पर्श एखादा रोग बरा होऊ शकतो, ही संकल्पनाच मुळात त्यावेळी नवीन होती. सुरुवातीचे चार-सहा महिने रुग्णांचा विश्‍वास संपादन करणे अवघड गेले, परंतु त्या दरम्यान मराठे आजींचा ऊर्जा (प्राणशक्ती) उपचारांच्या माध्यमातून बरे झाल्याचा अनुभव दै. सकाळच्या ‘मुक्तपीठ’सदरात छापून आला. त्या दिवसानंतर आजपर्यंत कधीही कोणत्याही रुग्णांनी आमच्यावर अविश्‍वास दाखविला नाही. म्हणतात ना, ‘अनुभवाचे बोल मोठे असतात’, याची प्रचीती आम्हाला त्यावेळी आली.

हळूहळू अनेकांना अनुभव येत गेले व निरामयचा विस्तार होत गेला. आज ‘निरामय’च्या पुणे, मुंबई व चिंचवड या शाखांध्ये 65 हजारांहून अधिक समाधानी रुग्ण आमच्याशी जोडले गेले आहेत. आम्ही लावलेलं हे रोपटं आज अश्वत्थाचं रूप घेत आहे. अनेक समविचारी हात या कार्यात जोडले जात आहेत, आज मागे वळून पाहताना खूप समाधान वाटतं.

सुरुवातीपासूनच प्राणशक्ती किंवा ऊर्जेच्या माध्यमातून उपचार करताना वेगवेगळे शोध व प्रयोग सुरू होते. अल्टरनेटीव्ह मेडीसिनमध्ये एम.डी. करत असताना या अभ्यासाला वेग आला. दुर्धर आजारांमध्ये परिणामकारक रिझल्ट मिळू लागले. या प्रवासातील अनुभव आणि अभ्यासातून उपचारांध्ये अनेक सकारात्मक बदल होत गेले. या सकारात्मक बदलांचा परिपाक म्हणजे ‘स्वंयपूर्ण उपचारपद्धती’ होय.

गेली पाच वर्षे चाललेल्या या अथक परिश्रमाची, तुमच्यासारख्या अनेकांच्या प्रेमाची, इच्छांची व अपेक्षांची फलश्रुती म्हणजेच निरामय! आता निरामय कन्सल्टन्सी बरोबरच सुरू होतंय वेलनेस सेंटर.

स्वयंपूर्ण उपचारपद्धतीच्या आधारे आम्ही रोगाच्या मुळापर्यंत जाऊन रुग्णांना शंभर टक्के निरोगी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. ही उपचारपद्धती नेमकी काय आहे, त्याचे काय फायदे आहेत आणि ती कशा पद्धतीने अवलंबली जाते, याविषयीची ही पुस्तिका आम्ही आपल्या हाती देत आहोत.

अधिकाधिक रुग्णांचे आजार दूर करण्याची ताकद आम्हाला मिळो, एवढीच इच्छा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. तुमचा आमच्यावरील विश्‍वास हीच आम्हाला सहज मिळणारी ऊर्जा आहे आणि ती चिरंतन राहील हा विश्वास आहे…

 धन्यवाद!

डॉ. योगेश चांदोरकर एम.डी.(अल्टरनेटीव्ह मेडीसिन)
डॉ. अमृता चांदोरकर एम.डी.(अल्टरनेटीव्ह मेडीसिन)
आणि माझा पुनर्जन्म झाला..... - सौ. कुसूम शेट्टी
ऑगस्ट 2011 मध्ये माझ्या हीपबोनला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याचे ऑपरेशन केले. त्यानंतर मला खोकला व दम लागू लागला. डॉक्टरांना दाखवले. त्यांनी त्यावर अस्थम्यासाठी औषधं सुरू केली. ती औषधं काही काळ घेतली पण फरक पडला नाही. दुसर्‍या एका डॉक्टरांना दाखविले, त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व तपासण्या केल्या, त्यामध्ये असे कळले की, अस्थमा नसून लंग्ज फायब्रोसीस हा आजार झाला आहे. त्यावर औषधं सुरू झाली. हे चालू असतानाच सप्टेंबर 2012 मध्ये डॉ. चांदोरकर यांची मुलाखत पाहिली. त्यांच्या उपचार प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती मिळवून त्यांची भेट घेतली.

मी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली, दिवसातून तीन वेळा ही ट्रीटमेंट होती. हळूहळू मला फरक जाणवू लागला. तीन महिने सलग ट्रीटमेंट घेतल्याने पुन्हा केलेल्या तपासण्यांध्ये फरक दिसला. त्यानंतर मी तीन महिन्यांसाठी दुबईला गेले. तिथूनही फोनवरून ट्रीटमेंट चालू होती. मी आता पूर्णपणे बरी आहे. ही अत्यंत प्रभावी उपचारपद्धती असून याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. …..