दूरस्थ उपचार

दूरस्थ उपचारांद्वारे रुग्ण जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी तो तेथूनही या उपचारांचा लाभ घेऊ शकतो व आपल्या शारीरिक अथवा मानसिक व्याधीतून मुक्त होऊन निरोगी आयुष्याचा आनंद घेऊ शकतो.

हे कसे शक्य होते, ते आपण समजून घेऊ. पेशंट कुठेतरी, डॉक्टर कुठेतरी आणि फक्त 5 ते 10 मिनिटं शांत बसून शारीरिक व मानसिक व्याधीतून मुक्ती कशी मिळू शकते? याचं उत्तर शोधण्यासाठी याचे शास्त्र समजून घेऊ.

आज आपण मोबाइलवर बोलतो. मोबाइलवर नंबर डायल केला की क्षणार्धात तो तुम्हाला जगाच्या पाठीवर कोठेही संपर्क करून देऊ शकतो. हे कसे घडते? वातावरणातील ध्वनिलहरींचे (टेलिकम्युनिकेशन) सॅटेलाईट द्वारे प्रक्षेपण होऊन ही प्रणाली कार्यान्वित होते व काही सेकंदात जगात कोठेही संपर्क साधता येतो. असेच या उपचारपद्धतीतही घडते. पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा नैसर्गिक रीत्या युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटीद्वारे एकमेकाशी संलग्न आहे. जसे आपण गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीशी बांधलेले आहोत, तसेच युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटीमुळे एकमेकांशी सांधलेले आहोत. या कनेक्टिव्हिटीमार्फत हे उपचार केले जातात. यासाठी उपचार घेणार्‍याच्या परवानगीची आवश्यकता असते व त्यासाठी त्याने फोन करणे गरजेचे असते.

फोनवरून उपचार :

वेळ – शनिवार ते गुरुवार, दुपारी २ ते रात्री ८

ऑफिस न. १०१, पहिला मजला,
मांडके बिझनेस सेंटर,
आप्पा बळवंत चौक,
पुणे , महाराष्ट्र , भारत.
फोन : 020-49041000
संपर्क करा

टेलीपथीबद्दल जर आपण ऐकले असेल, तर या पद्धतीमध्ये दोन किंवा अनेक व्यक्ती एकाच वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी ध्यानस्थ बसतात व या ध्यानस्थ अवस्थेत एकमेकांशी चर्चा करतात, विचारांचे आदान-प्रदान करतात, ते याच कनेक्टिव्हिटीद्वारे. मनापासून केलेली प्रार्थना किंवा मनापासून आलेली आठवण क्षणार्धात ऊर्जेमार्फत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असते व त्याची जाणीवही बरेच वेळा आपणास होते. पण आपण त्यास योगायोग समजतो. तो योगायोग किंवा चमत्कार नसून निसर्गनियम आहे. कोणताही चमत्कार निसर्गनियमांच्या पलीकडे जाऊन होत नाही. फक्त तो नियम आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याला चमत्कार वाटतो.

फोनवरून उपचार घेण्यासाठी, रुग्णाने सेंटरमध्ये फोन करून उपचारांसाठी तयार असल्याचे कळवायचे असते. उपचारक रुग्णाला उपचारांसाठी ‘बसा’ असे सांगतात. त्यानंतर फोन बंद करून पाच मिनिटे डोळे मिटून शांत, ध्यानस्थ बसणे आवश्यक असते. त्यावेळी शरीर शिथिल सोडून दीर्घ श्वसन केल्यास उपचारांचा अधिक लाभ होतो. जर रुग्ण बसू शकत नसेल तर तो झोपूनही उपचार घेऊ शकतो. जर रुग्ण इस्पितळात अतिदक्षता विभागात असेल किंवा कोमामधे असेल तर रुग्णाचे जवळचे नातेवाईक फोन करून त्याच्यावतीने उपचार घेण्यासाठी बसू शकतात.