अनुभव

अनुभव बहिरेपणा दूर झाला... - सौ. हर्षदा जावडेकर
दीड वर्षांपासून मला डाव्या कानात तात्पुरता बहिरेपणाचा त्रास होत होता. ‘इएनटी’ तज्ज्ञांना दाखविले, त्यांनी ‘आडिओेमेट्री टेस्ट’ करण्यास सांगितले. तपासणीनंतर असे कळाले की, डाव्या कानातून मेंदूकडे जाणारी शीर दबली गेल्याने कानातील बहिरेपणाचा त्रास उद्भवला आहे. डॉक्टरांनी मला पूर्णपणे बरे होण्याची शक्यता 50 टक्केच असल्याचे सांगितले. नोव्हेंबर 2011 मध्ये मी वर्तमानपत्रात निरामयबद्दल वाचले होते. त्यानुसार त्यापद्धतीने उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला. डॉ. योगेश चांदोरकर यांनी दिलेल्या उपचारांनी आश्‍चर्यकारक रीत्या केवळ चार दिवसांमध्येच माझा डाव्या कानातील बहिरेपणाचा त्रास पूर्णपणे बरा झाला. …..
आणि ‘अडचण’ दूर झाली - सौ. पूर्वा फुलंब्रीकर
मला साधारण 19 वर्षांपासूनच पिरिअडस्चा (पाळीचा) त्रास सुरू झाला होता. आज माझं वय 34 आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मला कधीही नैसर्गिक रीत्या पाळी आली नव्हती. माझ्या दोन्ही ओव्हरीज निकामी झाल्याने त्या काढून टाकण्याचा सल्लाही डॉक्टरांनी मला दिला होता. यासाठी मागील अनेक वर्षांपासून विविध प्रकारची औषधं घेत आहे, परंतु कोणताही सकारात्मक प्रतिसाद मला मिळाला नाही.

एक दिवस साम टीव्ही मराठीवर डॉ. चांदोरकर यांची मुलाखत पाहिली आणि एक शेवटचा उपाय म्हणून मी हा मार्ग अवलंबण्याचे ठरविले. डॉ. अमृता चांदोरकर यांनी माझी पहिली ट्रीटमेंट केली. उपचार चालू असतानाच तिसर्‍या महिन्याच्या शेवटी मला नैसर्गिक रीत्या पाळी आली. यामुळे मी आश्‍चर्यचकित झाले आणि दुसरीकडे समाधानही वाटले. गेल्या अनेक वर्षांत एक ‘एम.डी स्पेशालिस्ट’ डॉक्टर जे करू शकले नाहीत, ते डॉ. चांदोरकर यांनी काही महिन्यात करून दाखविले, तेही कोणत्याही औषधाविना.

डॉ. चांदोरकर व संपूर्ण ‘निरामय’ची मी अत्यंत आभारी आहे. …..

 • आमचे आयुष्य नेहमीप्रमाणे चालू होते आणि अचानक एक दिवस असा आला की, सर्वच विस्कळित झाले. तो दिवस होता 1 जुलै 2014. नेहमीप्रमाणेच त्यादिवसाचीही सुरुवात झाली, माझी पत्नी, सौ. वर्षा आंघोळीला गेली होती आणि अचानक तिला इलेक्ट्रॉनिक हीटरचा शॉक बसला व ती बेशुद्ध पडली. बेशुद्ध अवस्थेत असताना तो हीटर तिच्या हातातच होता व त्यावेळी तिला उलटीही झाली. अथक परिश्रमाने तिला बाहेर काढल्यानंतर आम्ही तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ‘बेशुद्ध अवस्थेत उलटी झाल्याने फुफ्फुसाचा संसर्ग होण्याची शक्यता असून, यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे,’ असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले.

  एकीकडे डॉक्टरांचे प्रयत्न आणि दुसरीकडे देवाकडे प्रार्थना असे चालू असताना वर्षाला तब्बल दहा दिवसांनी शुद्ध आली. हातापायाची हालचाल होत होती, परंतु फुफ्फुसाचा संसर्ग वाढतच गेला. सिटीस्कॅन केल्यावर असे लक्षात आले की, तिला न्युोनिया झाला असून त्यामुळे फुफ्फुसाला छिद्र पडले आहे. सोबतच ताप वाढणे, बीपी व पांढर्‍या पेशी कमी होणे हे प्रकार चालूच होते. ती अक्षरश: मरणाच्या दारातच उभी होती. परंतु मी आशा सोडली नव्हती. अशातच माझ्या मित्राकडून ‘निरामय’संदर्भात कळाले, तिथे संपर्क साधला. परंतु ‘निरामय’चे उपचार घेण्याची माझ्या पत्नीची क्षमता नव्हती.

  मग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वर्षाचा फोटो पाठवून तिच्यासाठी मी स्वत: ट्रीटमेंट घेऊ लागलो. 15 जुलैपासून तिच्यावर उपचार सुरू झाले आणि आश्‍चर्य म्हणजे त्याच दिवसापासून तिच्या अवस्थेत चांगला फरक पडत गेला. जशी जशी ही ट्रीटमेंट तिच्यावर होत गेली, तसे-तसे तिचे आजार कमी होऊ लागले. तापाचे प्रमाण कमी झाले, बीपी व पांढर्‍या पेशी नियंत्रणात आल्या. एवढेच नाही तर फुफ्फुसाचा संसर्गही कमी होत होता. तिच्या तब्बेतीमध्ये सुधारणा झाली परंतु घरी परत आल्यानंतरही तिला श्‍वास घेण्यास त्रास होत होता. पुढे ‘निरामय’चे उपचार चालूच ठेवले आणि एक दिवस असा आला की तिला होणारा श्‍वासाचा त्रासही पूर्णपणे बंद झाला. आता ती पूर्णपणे बरी झाली असून तिला कोणत्याही औषधांची सध्या आवश्यकता नाही.

  दैवी चमत्कार आणि ‘निरामय’च्या उपचारपद्धतींमुळे हे अविश्‍वसनीय, अनाकलनीय व अद्भुत असे काहीतरी घडले. यासाठी मी ‘निरामय’चा शतश: आभारी आहे.

  - श्री. मोरेश्‍वर कुलकर्णीमृत्यूची भेट अन् पुनर्जन्म!
 • मला दोन वर्षांपासून सर्दीचा खूपच त्रास होत होता. अनेक उपचार करूनही सर्दीचा त्रास काही कमी होत नव्हता. कायमच माझे नाक चोंदलेले असे. झोपेत तर मला खूपच त्रास होत होता. एका वेळेस मला 50 सुद्धा शिंका येत असत. मला कसली तरी अ‍ॅलर्जी आहे, असे डॉक्टरांचे मत होते. पण कसली, ते सांगता येत नव्हते. सर्व पॅथीचे उपचार करून झाले. तेव्हा तात्पुरता फरक पडायचा. पण परत त्रास सुरू. ‘सकाळ’मधील डॉ. चांदोरकरांचा लेख वाचून मी उपचार घेण्याचे ठरविले. उपचाराच्या पहिल्याच दिवशी मला बराच फरक पडला. दोन/तीन दिवसांनी दोन्ही नाकपुड्यांनी मी मोकळा ेशास घेतला, तेव्हा मला खूपच बरे वाटले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी नियमित दोन महिने उपचार घेतल्यावर माझा आजार पूर्ण बरा झाला आहे. आजपर्यंत मला सर्दीचा एकदाही अ‍ॅटॅक आलेला नाही. याबद्दल निरामयच्या सर्व डॉक्टरांचे आभार !…..

  - सौ. समता जोशीआणि मी मोकळा ेशास घेतला...
 • गेल्या अठरा वर्षांपासून मला संधिवाताचा त्रास होता. अनेक सांध्यांमध्ये डिफॉर्मिटी पण आलेली होती. सर्व पॅथीजचे उपचार करून बघितले परंतु कोणताही रिझल्ट मिळाला नाही. विशेषत: सांधेदुखी व गुडघेदुखीने जास्त त्रास दिला. घरातल्या घरात एक पाऊल चालणेही मला अशक्य झाले होते. पुण्यात मुलीकडे आलो, तिथे तज्ज्ञ डॉक्टरांना दाखविले. सर्व मोठ्या-मोठ्या चाचण्या केल्या परंतु ठोस असं कोणीच काही सांगितलं नाही. दरम्यानच्या काळात ‘सकाळ’ मुक्तपीठमध्ये सौ. नीलिमा रिसबुड यांचा लेख वाचला. त्यानुसार मुलीने ‘निरामय’ची चौकशी केली. मी चालू शकत नसल्याने, मुलीने तिथे जाऊन माझा फोटो दाखविला व फोनवरून उपचार सुरू झाले.

  साधारण दोन महिन्यानंतर लक्षणीय फरक जाणवला व मी नियमितपणे हे उपचार घेऊ लागले. या दरम्यान मी एकदा संगमनेर ते नागपूर रेल्वेचाही प्रवास केला, परंतु विशेष त्रास झाला नाही. आता माझे दैनंदिन व्यवहार मी व्यवस्थित करू शकते. डिफॉर्मिटीमधेही फरक जाणवत आहे. डॉ. चांदोरकर हे माझ्या आयुष्यात मला मिळालेला अल्लाउद्दीनचा जादूचा दिवाच आहेत असे मला मनोमन वाटते.

  - सौ. वैशाली दिनकरअल्लाउद्दीनचा जादूचा दिवा!
 • अगदी लहान-सहान आजारांमध्ये स्वत:कडे दुर्लक्ष करायचे ही बहुतांश महिलांची सवयच असते, मी ही त्यातीलच एक. फेब्रुवारी 2011 मध्ये कंबरदुखीचा थोडा त्रास सुरू झाला. परंतु त्याकडे मी दुर्लक्ष केले, एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासून मात्र कंबरदुखीने जोर धरला; असह्य वेदना होऊ लागल्या. ‘एमआरआय’ झाले. मणक्यात दोष असल्याचे निष्पन्न झाले. तज्ज्ञ डॉक्टरांना दाखविलं, औषधं सुरू केली, पण माझी स्थिती पूर्ववत् होईना. काही दिवसांनी या आजाराचे पूर्ण बेड रेस्टमध्ये रूपांतर झाले, एका अर्थी मी परावलंबीच झाले.

  यादरम्यान निरामयबद्दल कळले. आम्ही ट्रीटमेंट लगेचच सुरू केली. मी बरी होईन असा वेगळाच आत्मविश्‍वास माझ्यात बळावू लागला. पहिल्या आठ दिवसातच मला स्वत:मधील फरक जाणवू लागला. ‘स्वयंपूर्ण उपचार’ घेतल्याने आज मी व्यवस्थित फिरू शकत आहे. घरातल्या घरात फिरायलाही परावलंबी झालेली मी, ‘निरामय‘च्या ट्रीटमेंटमुळे जून 2012 मध्ये सुनेच्या बाळंतपणासाठी अमेरिका दौराही करून आले, हे विशेष. …..

  - सौ. सुनंदा बांठियामुक्तता कंबरदुखीतून...
 • कधीकधी आपल्याला नको असलेल्या आणि अशक्य अशा व्याधी जडतात. माझ्याबाबतीतही तसंच घडलं. माझ्या कंबरेच्या ‘अ‍ॅन्युअल एरिआ’मधली शक्ती नाहीशी होत असे. तेवढ्याच भागापुरता ‘विकनेस’ आल्याने रोजच्या शारीरिक हालचाली करणंही अवघड जात होतं. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलं, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार ‘मेडिकल सायन्स’मध्ये असं होण्याचं कारण न सांगता येण्यासारखं आहे.

  योगायोगाने ‘निरामय’बद्दल कळालं आणि डॉ. चांदोरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट सुरू केली. अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत मला बरं वाटायला लागलं. डॉ. चांदोरकर व ‘निरामयची मी ऋणी आहे. …..

  - श्रीमती सुचित्रा सिंगजीवन सुकर झाले.....

मैं आज अपनी सभी बिमारियों से मुक्ती पा चुकी हूँ. मुझे दो सालोसे घुटनों में तकलीफ, कमर में तकलीफ थी वो इस ट्रीटमेंट से खत्म हो गई है।

इस ट्रीटमेंट से ना कोई तकलीफ, ना कोई गोली, ना किसी तरह का व्यायाम, बस पाच मिनट अपनी ऑँखे बंद करनी होती है, मानो कोई जादू सा हो जाता है। और मेरी सारी तकलीफे खत्म हो गई। धन्यवाद! …..

- सफीया हबीब खान‘निरामय’ को धन्यवाद...

मी मंगळागौरीचे खेळ सादर करते. पण दीड-दोन महिने टाचदुखीने हैराण झाल्याने यंदा ते शक्य होणार नाही असेच वाटत होते. शेकून, चोळून, गोळ्या घेऊन पाहिले पण फरक पडला नाही. योगायोगाने डॉ. चांदोरकर यांच्या स्वयंपूर्ण उपचार पद्धतीबद्दल माहिती मिळाली. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 15  दिवस उपचार घेतले. आता माझी टाचदुखी पूर्ण थांबली असून मी पूर्वीसारखी व्यवस्थित चालू शकते. …..

- सौ. नवरेटाचदुखी बंद झाली..

टेनिस एल्बोचा त्रास सुरू झाल्यानंतर मी रेग्युलर औषधं घेत होते. 15 दिवस हात गळ्यातसुद्धा बांधला होता. परंतु अजिबात सुधारणा नव्हती. जेव्हा मी निरामयमध्ये आले, तेव्हा स्वयंपूर्ण उपचारांमुळे माझा टेनिस एल्बोचा त्रास एकाच सिटींगमध्ये बरा झाला आणि आज चार वर्षांत पुन्हा मला हा त्रास कधीही झालेला नाही.

- सौ. श्रुती कुलकर्णीत्रास बरा झाला तो कायमचाच !

मागील चार-पाच वर्षांपासून मला गुडघेदुखीचा भयंकर त्रास होत होता. चालणे, फिरणे, अगदी घरातल्या घरात मांडी घालून बसणेही मला शक्य होत नव्हते. त्यामुळे एका अर्थी आयुष्याला खीळच बसली होती. सर्व प्रकारची औषधं घेऊन पाहिली, सर्व उपाय केले तरीही रिझल्ट शून्यच होता. मुख्य म्हणजे त्या मोठ्या-मोठ्या गोळ्या घ्यायचा मला मनस्वी कंटाळा यायचा.

असंच एक दिवस ‘निरामय’च्या डॉ. चांदोरकर यांची मुलाखत पाहण्यात आली. परंतु मी राहायला आकुर्डीला आणि ‘निरामय’ पुण्यात होतं. त्यामुळे जाणं शक्य झालं नाही. कालांतराने ‘निरामय’ची शाखा चिंचवड मध्ये सुरू झाल्याचे कळाले आणि मी लगेच त्यांना जाऊन भेटले. डॉ. चांदोरकर यांनी पहिल्या भेटीतच आजार बरा होईल, असा विश्‍वास माझ्यात निर्माण केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे नियमित उपचार सुरू केले आणि आश्‍चर्यकारक रीत्या माझी गुडघेदुखी कमी होऊ लागली. दोन महिन्यांच्या उपचारानंतर मी पूर्ण बरी झाले. या उपचारामुाळे आयुष्य गतिमान झाल्याचे मला वाटते आहे. आज मी घरातील सर्व कामं करू शकते, बाहेर फिरू शकते. मला दिलेल्या या शक्तीसाठी डॉ. चांदोरकर यांची मी आभारी आहे. …..

- सौ. शिवाली सोनारआयुष्याला गती मिळाली

मला पायांच्या भोवर्‍यांचा दहा वर्षांपासून त्रास होता. मुंबईतील बर्‍याच नामवंत डॉक्टर्सचे उपचार घेऊनसुद्धा काहीच फरक पडला नाही.

20 ऑक्टो. 2012 रोजी निरामय मध्ये उपचार सुरू केले. या उपचारांमुळे माझ्या भोवर्‍यांमध्ये व पायांच्या त्वचेमध्येही चांगला फरक पडला. …..

- सौ. शीतल आडकरसुखावह झाले

मार्च 2012 मध्ये मला न्यूमोनिया झाल्याचे लक्षात आले आणि या ट्रीटमेंटसाठी मला जहांगीरला अ‍ॅडमिट करण्यात आले. उपचाराच्यादरम्यान ‘टुडी इको’ व ‘डॉप्लर’च्या टेस्ट झाल्या. त्यानंतर झालेल्या ‘अ‍ॅन्जिओग्राफी’ मध्ये एक 100 टक्के व दुसरे 50 टक्के ब्लॉकेज असल्याचे कळाले. त्यावेळी ‘ईएफ’चा फॅक्टर 30-35 टक्के होता. तात्काळ कोणताही निर्णय न घेता आम्ही थोडा विचार करण्याचे ठरविले.

मित्राच्या सल्ल्याने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ‘निरामय’मध्ये माझा फोटो दाखवून उपचार सुरू करण्यात आले. दोन आठवड्यांनी मी स्वत: डॉ. चांदोरकर यांना जाऊन भेटलो. डॉ. योगेश व डॉ. अमृता चांदोरकर यांनी केलेल्या वर्षभराच्या उपचारानंतर ‘टुडी इको’मध्ये ‘ईएफ फॅक्टर’ 50 टक्के झाल्याचे आढळून आले आहे. आता मी दररोज 3-4 किमी चालू शकतो व माझी इतरही सर्व कामे करू शकतो.

- श्री. सुभाष साळवेआजारही बरा होऊ शकतो...

माझे वडील अल्झायमरचे पेशंट होते (वय 89). त्यामुळे त्यांना विस्मृती व कशाचेही भान नसण्याचा त्रास होता. हॉस्पिटलमधील उपचारांचाही त्यांच्यावर परिणाम झाला नाही. घरी आल्यावर ते पूर्णपणे अंथरुणाला खिळून होते. स्वतःच्या आवश्यक गोष्टीही त्यांना करता येत नव्हत्या. पुढे पुढे त्यांची हालचालही बंद झाली. आम्ही हैद्राबादमध्ये असल्यामुळे त्यांना पुण्यात निरामयला घेऊन येणे शक्य नव्हते. पण त्यांना उपचारांची नितांत गरज होती.

डॉ. चांदोरकरांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचा लेटेस्ट फोटो व सर्व माहिती बहिणीच्या हाती पाठविली. त्यानंतर फोनवरून स्वयंपूर्ण उपचार सुरू झाले. पहिल्या पाच दिवसांमध्ये आम्हाला वडिलांमध्ये काही पुसटशा सुधारणा दिसू लागल्या. महिन्याभरामध्ये त्यांना भुकेची जाणीव होऊन जेवण मागू लागले. त्यांच्या डोळ्यांत आम्हाला ओळख दिसू लागली. याच वेळी युरिन ट्रॅकचा प्रॉब्लेम झाल्यामुळे लघवी अडली होती. या स्थितीची डॉक्टरांना कल्पना दिल्यावर त्यातही लगेचच सुधारणा जाणविली. तीन महिन्यांमध्ये ते आधाराशिवाय चालू लागले व स्वतःची दैनंदिन कामे करू लागले. …..

- श्री. जगदीश बहिरटविस्मृतीतून परत आले...

ऑक्टोबर 2011 मध्ये मला अंजायनाचा त्रास सुरू झाला. तातडीने इस्पितळात दाखल केले. एन्जोग्राफीमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त, चार ठिकाणी ब्लॉकेजेस असल्याचे आढळले व लगेचच बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला गेला. ही शस्त्रक्रिया करण्याची माझी इच्छा व मानसिक तयारी नव्हती.  डॉ. चांदोरकरांनी माझे रिपोर्टस् पाहून ‘तुम्ही जर पूर्ण विश्रांती घेणार असाल, तर आपण लगेचच उपचार सुरू करू’ असे सांगितले. मीही कबूल झालो. हॉस्पिटलमधून घरी आलो. तेव्हा मला बोलतानाही दम लागत होता. नुसती दाढी करूनही मी दमत होतो. ट्रीटमेंट सुरू झाल्यावर 15 दिवसांतच दम थोडा कमी झाला. घरातल्या घरात वावरणे थोडे सुखकर झाले. महिन्याभरात थोडं अंतर चालणे शक्य होऊ लागले. पुढे जिना उतरणं व चढणं शक्य होऊ लागलं. हळूहळू काही तास ऑफिसला जायला सुरुवात केली. दैनंदिन व्यवहार सुरळीत होऊ लागले. स्ट्रेस टेस्टमध्येही घडणारे बदल सकारात्मक होते. 5 ते 6 महिन्यांमध्ये मला खूपच बरे वाटू लागले व मी कामावर रुजू झालो.

या दरम्यान मला स्पॉन्डिलायटीस, चक्कर येणे, डाव्या कानातून आवाज येणे, ऐकू न येणे असे त्रासही होऊ लागले. अनुक्रमे एकातून बाहेर पडल्यावर दुसरा असे हे सर्व त्रास माझ्या राशीला येऊन गेले ‘काहीही त्रास वाटला तर फोनवर सांगा. तो आपण बरा करू’ हा विश्‍वास डॉ. चांदोरकरांनी दिल्यामुळे एक त्रास बरा झाल्यावर उद्भवलेला दुसरा त्रास मी त्यांना सांगत राहिलो. वेगवेगळे डॉक्टर्स नकोत, नवनवीन तपासण्या नकोत. मी पूर्ण विेश्‍वासाने उपचार चालू ठेवले. आज मी जेव्हा माझ्याप्रमाणे एकापेक्षा जास्त आजारांनी ग्रस्त रुग्ण बघतो, तेव्हा मला त्यांच्यात व माझ्यात मूलभूत फरक जाणवतो तो मनोबलाचा, सकारात्मकतेचा आणि आरोग्याचाही. …..

- श्री. विजय साठेबायपास टळली

सततचा बदलीचा त्रास, बाहेरचं जेवण याला कंटाळून मी 2000 साली बँकेच्या नोकरीतून निवृत्ती घेतली. पहिली दीड वर्ष बरी गेली. त्यानंतर काही ना काही शारीरिक समस्या जाणवू लागल्या. जसे की, भूक न लागणे, अशक्तपणा, तोल जाणे, पोट फुगणे, पायात त्राण नसणे इ. अशक्तपणा फारच वाढल्यामुळे सर्व टेस्ट करून घेतल्या. क्रॉनिक लिव्हर डिसीजचे निदान झाले. मला ताबडतोब दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आले.

तब्बल सतरा दिवस रुग्णालयात घालविल्यानंतर मला डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर काही दिवस बरं वाटलं परंतु मूळ त्रास काही कमी झाला नाही. त्यामुळे आत्मविेश्‍वासही कमी होऊ लागला होता. एके दिवशी ‘निरामय’ची जाहिरात माझ्या पत्नीच्या वाचनात आली व तिने तातडीने चौकशी केली. अशक्तपणा जास्त असल्याने माझी हो ट्रीटमेंट सुरू झाली. गेली तीन महिने मी सातत्याने ‘स्वयंपूर्ण उपचार’ घेत आहे आणि मला त्याचा फरक जाणवतो आहे. सकारात्मक दृष्टिकोन, शारीरिक क्षमता, आत्मविश्‍वास, मनःशक्ती यामध्ये अनेकपटींनी वाढ झाली आहे. मला घरी येऊन किंवा वेळोवेळी फोनवरून ट्रीटमेंट देणार्‍या डॉ. कानडे यांचा मी मनापासून आभारी आहे. …..

- श्री.आनंद देशपांडेआत्मविश्वास मिळाला...

ऑक्टोबर 2012 मध्ये मला ‘नागिणी’च्या आजाराने ग्रासले. पाठीवर आणि छातीवर पाण्याने भरलेल्या छोट्या पुळ्या झाल्या होत्या. कोणीतरी आपल्याला गरम सुईने टोचत असल्यासारखा त्रास होत होता. यासंबंधी आमच्या ‘फॅमिली डॉक्टरां‘शी चर्चा केल्यावर त्यांनी वैद्यकीय दृष्ट्या हतबलता दाखविली. पेनकिलर देण्याशिवाय  माझ्याकडे काहीच पर्याय नसल्याचे त्यांनी मला सांगितले.

एक आठवडा या असह्य वेदना सहन करत मी कोणत्यातरी चमत्काराच्या प्रतीक्षेत होतो. त्यावेळी माझ्या मामेबहिणीने डॉ. योगेश चांदोरकर यांचे नाव सुचविले. पहिल्या ट्रीटमेंटमध्येच मला थोडा धीर आला. दोन दिवस सातत्याने ट्रीटमेंट घेतल्यावर वेदना होणे पूर्णपणे थांबल्या व तिसर्‍या दिवशी पुळ्यांच्या खपल्याही पडल्या व त्वचा स्वच्छ होऊ लागली.

डॉ. चांदोरकरांनी कोणत्याही औषधाविना मला पूर्णबणे बरं केल्याने माझ्यासह माझ्या सर्व कुटुंबीयांना तसेच खुद्द ‘फॅमिली डॉक्टरां‘नाही एक चमत्कार घडल्याचाच अनुभव आला. …..

श्री. दिलीप पंडित, ग्रुप कॅप्टनचमत्काराचाच अनुभव!

मला बरेच वर्षांपासून तोंड येणे व अल्सरचा त्रास होत होता. जिभेला अल्सर झाल्यामुळे बोलताना, खाताना खूप त्रास व्हायचा. यावर मार्ग काढण्यासाठी अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेद अशा सर्व औषधोपचार पद्धतींची मदत घेतली, परंतु त्याने तेवढ्यापुरते बरे वाटायचे अन् काही काळाने तो आजार परत उद्भवायचा. नातलगांनी सुचविल्याप्रमाणे मी ‘निरामय‘च्या डॉ. चांदोरकर यांची भेट घेतली. अतिशय सोपी, सुटसुटीत उपचारपद्धती असल्यामुळे, उपचार घेण्याचा त्याचदिवशी निर्णय घेतला. पहिल्या पंधरा दिवसात मी 50 टक्के बरी झाले होते. नंतरच्या टप्प्यातील उपचाराने माझे दुखणे अक्षरश: नाहीसे झाले. मी कोणत्याही औषधांशिवाय ठणठणीत झाल्याचा मला आनंद आहे. …..

- सौ. नंदा घोलपऔषधाविना बरं झाल्याचा आनंद

दोन वर्षांपासून सतत सर्दी व कान वाहणे अशा तक्रारी होत्या. कान सतत वाहत असल्याने कानाच्या पडद्याला होल पडले. त्यासाठी डॉक्टरांनी कानाचे ऑपरेशन करण्यास सांगितले होते. याच दरम्यान आम्हाला निरामयबद्दल कळले. ‘बघू तर काय आहे ते!’ म्हणून आम्ही पुण्याच्या सेंटरला येऊन उपचार सुरू केले. दोन महिने सलग उपचार घेतले. पहिल्या ट्रीटमेंटपासून रिझल्ट मिळत गेले. कानाचं दुखणं खूपच कमी झालं. आम्ही इएनटी स्पेशालिस्टकडेही जाऊन आलो. त्यांनी कान तपासले व कानाच्या पडद्याला होल नसल्याचे सांगितले. त्यांना आणि आम्हाला खूपच आश्‍चर्य वाटले. …..

- सौ. हेमा देशमुखकर्णशूळ बरा झाला

नोव्हेंबर 2008 मध्ये एक दिवस अचानक मला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो असता त्यांनी बर्‍याच टेस्ट करायला सांगितल्या. काही टेस्टची नावेसुद्धा कधी ऐकलेली नव्हती. निदान झाले की माझ्या दोन्ही किडन्या क्षीण झाल्या आहेत. कालांतराने डायलिसीस करावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. त्या धक्क्याने माझा रक्तदाब इतका वाढला की तिथेच बेशुद्ध पडले. मला अ‍ॅडमिट करणे, परत टेस्ट करणे, हे सर्व सोपस्कार झाले. नंतर नेफ्रॉलॉजिस्टची ट्रीटमेंट सुरू झाली. खूप गोळ्या सुरू झाल्या. मी मनाने पूर्ण खचले होते. अशा परिस्थितीत एक दिवस आमचे जावई अमोल यांनी मला निरामयमध्ये नेले. डॉ.चांदोरकरांनी मला मानसिक आधारही दिला व स्वयंपूर्ण उपचार सुरू केले.

या उपचारांमुळे माझ्या प्रकृतीत खूपच सुधारणा झाली आहे. माझी तब्येत अगदी पूर्ववत् झाली असून, बी.पी.सुद्धा नॉर्मल झाले आहे. आता माझी औषधेही बंद झाली असून, रिपोर्टस्ही नॉर्मल आहेत. …..

- सौ. स्मिता रकटेमोठ्ठे दुखणे टळले

मागील सोळा वर्षांपासून मी सोरायसिस या आजाराने त्रस्त होतो, त्यातच भर म्हणून की काय, गेल्या वर्षभरापासून मला अधिक अस्वस्थता जाणवू लागली. यादरम्यान मी डॉ. अमृता चांदोरकर यांची साम टीव्हीवर मुलाखत पाहिली व त्यांच्यावर विश्‍वास ठेवून माझ्या आजारासंदर्भाने उपचार चालू केले.

नियमितपणे उपचार घेतल्यानंतर मला समाधानकारक फरक जाणवू लागला. अस्वस्थतेचा त्रास तर काही दिवसातच बरा झाला असून सोरायसिसमध्ये 90 टक्के सुधारणा आहे. मी एकही दिवस उपचार चुकविले नाहीत आणि नियमित ‘फॉलोअप’लाही जातो आहे. या उपचारपद्धतीचा कोणताही दुष्परिणाम नाही, हे विशेष. मात्र हे करत असताना श्रद्धा आणि विश्‍वास ठेवल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम मी अनुभवतो आहे. …..

- श्री. सुधीर निकमश्रद्धा अन् विश्वास ठेवा...

लग्नानंतर बरीच वर्षं आम्हाला मूल होत नव्हते. मी व माझे पती यामुळे खुप चिंतित असायचो, त्यामुळे नकळत आमच्यावर मानसिक ताण यायचा. याच काळात मला ‘निरामय’बद्दल कळाले, मी लगेच त्यांची ट्रीटमेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. उपचार सुरू झाल्यानंतर काही महिन्यात मला दिवस गेल्याचे कळाले आणि माझ्या आनंदाला परिसीमाच उरली नाही.

परंतु नंतर ‘डिलिव्हरी‘ची व निरोगी बाळाची काळजी लागली. त्यासाठी मी सातत्याने ही ट्रीटमेंट सुरू केली. अखेरीस आमच्या आयुष्यात तो आनंदाचा क्षण आलाच. मला मुलगा झाला आणि तोही निरोगी! हा माझ्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय क्षण होता. मला ट्रीटमेंट देणार्‍या डॉ. यशवंत कानडे व संपूर्ण ‘निरामय‘ परिवाराची मी आभारी आहे. धन्यवाद! …..

- सौ. सोनाली आवारेमूल झाले आणि निरोगीही...

माझा स्वत:वर कधीच विश्‍वास नव्हता. कोणतेही कार्य करण्यासाठी माझे धाडसच होत नव्हते. मी सतत भीती आणि दडपणाखालीच वावरायचो. मनाची शक्ती आणि आत्मविश्‍वास वाढविण्याच्या दृष्टीने मी ‘निरामय’ला भेट दिली. तेथील डॉ. कानडे यांची मी गेल्या एक वर्षापासून ट्रीटमेंट घेत आहे. आता माझ्यातील आत्मविश्‍वास बळावला आहे आणि आज मी एका चांगल्या कंपनीत नोकरीही करत आहे. हे साध्य झाले केवळ ‘निरामय’मुळे. माझ्यात अविश्‍वसनीय फरक पडला आहे, त्यामुळे मी ‘निरामय’चा आणि डॉ. यशवंत कानडे यांचा आभारी आहे.

- श्री. अमोल सपकाळआत्मविश्वास मिळाला...

माझा मुलगा 28 वर्षांचा आहे. चांगला डबल ग्रॅज्युएट झालेला. 2009 पासून नोकरीच्या शोधात होता. अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, पण यश आले नाही. ऑगस्ट 2011 मध्ये ताण सहन न होऊन डिप्रेशनमध्ये गेला. आम्हाला काय करावे कळेना. तो डॉक्टरांकडे येण्यास तयार नव्हता. त्याची स्थिती सांगून, डॉक्टरांकडून औषधे आणली. पण तो त्या खोल निराशेतून बाहेर येत नव्हता. चिडला की इतका चिडायचा, मारायला धावायचा. आम्ही त्याच्यापुढे हतबल होऊन जायचो.

एप्रिल 2012 मध्ये निरामयबद्दल कळले. फोटोवरून ट्रीटमेंट करता येणे शक्य होते, त्यामुळे त्याचा फोटो घेऊन मी तेथे गेलो. शिवाय कोणतीही औषधे नसल्यामुळे आमच्यासाठी खूपच सोपे झाले. मी फोन करून त्याच्या वतीने ट्रीटमेंट घेऊ लागलो. सहा महिने उपचार घेतल्यानंतर आता तो 80 टक्के बरा झाला आहे. त्याला नोकरीही लागली असून, तो आत्मनिर्भर होताना आम्हाला जाणवते आहे. आम्ही निरामयचे खूप आभारी आहोत. …..

- अनामिक अनुभवचिंता मिटल्या...

घरात पाणी सांडले होते आणि त्यावरून मी घसरले. गुडघ्याला थोडा मार लागला, परंतु नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष केले. नंतर बाजारात काही साहित्य आणताना घाईने चालत होते व अचानक पाय ट्विस्ट झाला. गुडघ्याला लागलेला तो मार इतका होता की, डाव्या गुडघ्याची वाटी पूर्ण सरकून मागच्या बाजूला गेली. त्यानंतर ‘एमआरआय’ काढल्यावर असे कळाले की, लिगामेंट फाटले आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितले. ठराविक कालावधीनंतर दोन ऑपरेशन्स करावी लागणार होती आणि त्यासाठी 5-6 लाख रुपये खर्च होता. शिवाय त्यानंतर मांडी घालता येणार नव्हती, फार वजन उचलता येणार नव्हतं, अशा अनेक मर्यादा येणार होत्या.

ऑपरेशनची तारीख जवळ आलेली असतानाच साम टीव्हीवर डॉ.चांदोरकर सरांची मुलाखत पाहिली. लगेचच ‘निरामय’मध्ये फोन केला आणि डॉक्टरांची भेट घेतली. चांदोरकर सरांनी आम्हाला धीर दिला. आम्ही

ऑपरेशन करण्याचा निर्णय रद्द केला आणि ‘निरामय’चे फोनवरून उपचार सुरू झाले. जसे महिने पूर्ण होत गेले, तशी माझ्या गुडघ्यांध्ये सुधारणा होत गेली. सहा महिन्यांनी मी पूर्ववत् झाल्याचे मला जाणवू लागले. पुढचे अजून

सहा महिने ट्रीटमेंट घेतल्यावर प्रवास करणे, जास्तीची ऊठबसही मी करू लागले. कार्यामध्ये फुगड्याही घालू शकले. दरम्यानच्या काळात मी अष्टविनायक दर्शनही केले. वर्षभराच्या उपचारांनी मी पूर्ण बरी झाले. दीड वर्षानंतर काढलेल्या ‘एमआरआय‘मधे कोणतेही दोष आढळले नाहीत. …..

- सौ. लतिका नरकेआणि ऑपरेशन टळले....

मला सिव्हिअर फ्रोजन शोल्डरचा त्रास होता. इतका की मला शर्टच्या बाहीमध्ये हात घालण्यासाठीही मदतीची गरज पडत होती. उजवा खांदा पूर्णपणे आखडलेला होता. तिथे प्रचंड वेदना होत्या. उजवा हात असल्यामुळे सर्वच बाबींमध्ये खूपच बंधने येत होती. औषधे सुरू होतीच. पण म्हणावा असा गुण येत नव्हता. त्यातच सकाळ मुक्तपीठ मध्ये मराठे आजींचा अनुभव वाचनात आला. काहीतरी वेगळी उपचारपद्धती होती. म्हटलं जाऊन तर बघू. निरामयमध्ये मी आलो तो दिवस होता 4 मे 2010. त्या दिवसापासून ट्रीटमेंट सुरू झाली. तीनच महिन्यात बराच फरक पडला. दुखणं पूर्ण थांबलं. हाताची मुव्हमेंटही व्यवस्थित होऊ लागली. पुढेही ट्रीटमेंट सुरू ठेवली व सहा महिन्यात मी पूर्ण बरा झालो व माझी मी गाडी देखील चालवू लागलो. …..

- श्री. जयदीप चांदवाणीपरस्वाधीनता संपली

माझा मुलगा विवेक हा गेली सात वर्षे मस्न्युलर डिस्ट्रॉफी या आजाराने त्रस्त होता. आम्ही अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतले. परंतु काही उपयोग झाला नाही. या आजारावर काहीही उपचार नाहीत, असे आम्हाला स्पष्ट सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही खूपच खचून गेलो. तो पूर्णपणे परावलंबी जीवन जगत होता. स्वतःचे हात, पाय हलवणे अथवा मान हलवणे हेही त्याला शक्य नव्हते. माझ्या मुलाला अशा अवस्थेत आम्ही पाहू शकत नव्हतो. पण काय करणार ? कुठेही आशेचा किरण दिसत नव्हता.

एक दिवस विवेकच्या मावशीने फोन करून निरामयबद्दल आम्हाला सांगितले. शेवटचा पर्याय म्हणून मी विवेकचा फोटो व वैद्यकीय रिपोर्ट घेऊन पुण्याला डॉक्टरांची भेट घेतली व स्वयंपूर्ण उपचार सुरू झाले. एका महिन्यातच त्याच्यात फरक दिसू लागला. त्याच्या हातापायांमध्ये हालचाल जाणवू लागली. शरीरातील वाढलेल्या चरबीचे प्रमाणही कमी झाले. पुढील काही महिन्यात तो हात वर करू लागला. एका जागी जास्त वेळ बसता येऊ लागले.

उशिरा का होईना योग्य दिशा व उपचार मिळाले. गेली दोन वर्षे आम्ही स्वयंपूर्ण उपचार घेत आहोत. आता विवेक मांडी घालू शकतो. स्वतःच्या हाताने जेवतो. त्याच्या स्नायूंची गेलेली ताकद पूर्ववत् होत आहे. पायात व कमरेतही पूर्वीपेक्षा जास्त ताकद आली आहे व तो उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे. आता तो पूर्ण बरा होईल याबाबत तीळमात्र शंका वाटत नाही. …..

- श्री. विजय आचायनाही असं कोण म्हणतं?

19 जानेवारीची 2013 ची पहाट माझ्यासाठी अनाकलनीय होती. पहाटे अचानक प्रचंड पोट दुखून उलट्या सुरू झाल्या. अगदी चमचाभर पाणीही घेतले तरी पोटात राहत नव्हते. लगेचच सकाळी 10 वाजता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी केली, ब्लड टेस्ट केल्या. त्यात असे लक्षात आले की मला कावीळ झाली आहे. डॉक्टरांनी तातडीने मला रुग्णालयात अ‍ॅडमिट होण्यास सांगितले. निरामयचा पूर्वानुभव असल्यामुळे आम्ही ते टाळले व डॉ.चांदोरकरांना फोनवरून संपर्क करून लगेच स्वयंपूर्ण उपचार सुरू केले. त्यादिवशी दर एक तासाला हे उपचार घेतले. दुसर्‍या दिवशीच्या सकाळी मी कोणत्याही औषधाविना उठून बसू शकले. त्यानंतर काही दिवस हे उपचार घेतल्याने मी पूर्णत: बरी झाले.

- सौ. आशा गजेवारदिवशी माझा पुनर्जन्म झाला...

माझा मुलगा देवांश याला जुलाबांचा खूपच त्रास होता. शहरातील तीन नामांकित बालरोगतज्ज्ञांचे उपचार घेऊन झाले. त्याला वरण-भाताव्यतिरिक्त काहीही पचत नव्हते. तो पाच महिन्यांचा असल्यापासून त्याला दूधही बंद करण्यात आले होते. एक वर्षाचा होईपर्यंत त्याला तीन वेळा अ‍ॅडमिट करावे लागले. तो अत्यंत अशक्त होता व सतत रडत राहायचा.

आमच्या एका नातेवाइकांच्या सल्ल्याने मी निरामयमध्ये ट्रीटमेंट सुरू केली. पहिल्या पंधरा दिवसांतच खूप फरक जाणवला. त्याला दिवसातून अनेक वेळा जुलाब व्हायचे, ते खूपच कमी झाले. त्यानंतर त्याला कधीही अ‍ॅडमिट करावे लागले नाही. हळूहळू त्याला अन्न पचू लागले, वजन वाढू लागले, रडणे कमी होऊन तो खेळू लागला.

तो लहान असल्यामुळे, मीच त्याच्यासाठी उपचार घेत होते व तो बरा होत होता. 3 महिन्यांमध्ये तो पूर्ण बरा झाला. आता तो 2 वर्षांचा असून अतिशय सुदृढ आहे. …..

- सौ. पल्लवी लडकतजुलाब थांबले, पचन सुधारले...

मार्च 2011 मध्ये सर्व टेस्टस् केल्या व सगळेच आकडे निराशाजनक आले. शुगर 131/216, कोलेस्टेरॉल 250, ट्रायग्लिसराईडस् 647, टीएसएच 8.56 सगळ्याच व्हॅल्यू वाढलेल्या होत्या. आता सगळ्यासाठी औषधं घ्यावी लागणार व ती आयुष्यभर! मी खूपच निराश झाले होते. पण योगायोगाने निरामयबद्दल कळले. औषधं सुरू करण्याच्या आधी आपण हे उपचार करून बघायला काय हरकत आहे? असा विचार करून मी तिथे गेले. महिनाभर रेग्युलर स्वयंपूर्ण उपचार घेतल्यानंतर मी पुन्हा रिपोर्टस् केले. तर त्यामधे शुगर 80/138, कोलेस्टेरॉल 156, ट्रायग्लिसराईडस् 90 व टीएसएच 5.54 आले. कोणत्याही औषधाशिवाय हे शक्य झाले, हे विशेष!

मी सगळे रिपोर्टस् अ‍ॅलोपॅथिक डॉक्टर्सनाही दाखवले. ते ही आश्‍चर्यचकित झाले आणि मी औषधं घेण्यापासून वाचले. …..

- सौ. जयश्रीअनुभव मी संपूर्ण निरोगी झाले

मी स्वतः एक डॉक्टर आहे. वय-34. पण कुणाच्या तरी हलगर्जीपणामुळे मी एचआयव्हीग्रस्त झाले. मेडिकल सायन्समध्ये यावर काही उपाय नाही हे मला माहीत असल्यामुळे, जास्त निराश झाले होते. शक्य ती सर्व पथ्य पाळण्याचा प्रयत्न मी करतच होते. तरीही अशक्तपणा वाढतच होता. वजन कमी होत होतं. तब्येतीच्या कुरबुरी सुरू झाल्या होत्या.

कुठून तरी निरामयबद्दल वाचनात आले, या विनाऔषध-विनास्पर्श उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक आजार बरा होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे होते. मी फोन केला व माझ्या आजाराबद्दल सांगितले. पलीकडून उत्तर आले की, ‘हे ही बरे होऊ शकते. फक्त तुम्हाला नियमित व दीर्घकालीन उपचार घ्यावे लागतील.’ मी आश्‍चर्यचकित झाले, अविश्‍वासही वाटला. मग विचार केला करून बघायला काय हरकत आहे!

जेव्हा पुण्यातल्या निरामयच्या क्लिनिकला भेट दिली, तेव्हा माझं वजन 26 किलोवर आलं होतं. मला अन्न जात नव्हतं. काहीही खाल्लं तरी सतत जुलाब होत होते. संडास व लघवीवरील नियंत्रण सुटलं होतं. मी मृत्यूच्या दारात उभी होते आणि प्रत्येक क्षण अत्यंत वेदनादायी होता.

डॉ. अमृता चांदोरकरांना भेटल्यावर, सर्वप्रथम त्यांनी माझे समुपदेशन केले. त्यातून मला जगण्याची आशा निर्माण झाली. जुलै 2014 पासून मी फोनवरून उपचार घेऊ लागले. या चार महिन्यात माझे वजन वाढून 34 किलो झाले आहे. भूक लागते. अन्नपचन व्यवस्थित होते. संडास व लघवीवर नियंत्रण आले आहे. काळी पडलेली त्वचा उजळू लागली आहे. मी घरच्याघरी ट्यूशन्सही घेऊ लागले आहे. अजून काही महिन्यांत मी या आजारातून पूर्णपणे बाहेर पडेन अशी आशा वाटते आहे. मेडिकल सायन्स म्हणजे शेवट नाही, याही पुढे काहीतरी आहे याची प्रचीती मला इथे आली.

माझ्यासारख्या व्याधिग्रस्तांसाठी निरामय जे कार्य करतं ते अनमोल आहे. त्यांच्या संपूर्ण स्टाफला माझा सलाम. …..

- अनामिक प्रतिक्रियामृत्यू मागत होते, पण मार्ग मिळाला

वयोमानानुसार मला अनेक व्याधी जडल्या होत्या. परंतु सप्टेंबर 2013 मध्ये मला डायबेटीक रेटिनोपॅथी म्हणजे उजव्या डोळ्यात डायबेटीसमुळे क्लॉट आले असल्याचे समजले व ते क्लॉट फुटले तर आंधळेपणा येण्याची भीती डॉक्टरांनी वर्तविली. या आजारावर ठोस काही उपाय नसल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे मी खरंतरं मनोन घाबरले होते.

एप्रिल 2014 मध्ये मी ‘निरामय’ची ट्रीटमेंट सुरू केली. डॉ. अमृता चांदोरकर यांनी मला दिवसातून दोन वेळा फोनवरून ट्रीटमेंट घेण्यास सांगितले. गेले आठ महिने मी उपचार घेत असून, नोव्हेंबर 2014 मध्ये माझी त्या डोळ्याची तपासणी झाली असून, डोळा एकदम क्लिन असल्याचे डोळ्याच्या डॉक्टरांनी सांगितले.

माझी दृष्टी जाण्यापासून वाचवल्याने मी ‘निरामय’ व डॉ. अमृता यांची आभारी आहे. माझ्या इतरही व्याधी या उपचाराद्वारे बर्‍या करण्यासाठी आगामी काळात मी ट्रीटमेंट घेणार आहे. …..

- सौ. स्मिता कुलकर्णीमोठ्या संकटातून वाचले...

माझं दैनंदिन आयुष्य सुरू होते. 26 ऑक्टोबर 14 रोजी अचानक माझ्या पोटात आणि पाठीत खूप वेदना होऊ लागल्या, तात्पुरता उपाय म्हणून ‘पेनकिलर’चे इंजेक्शन घेतले. दुसर्‍या दिवशी डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी सोनोग्राफी केली. त्या रिपोर्टनुसार माझ्या मूत्रनलिकेत 11 एमएम आणि उजव्या बाजूच्या किडणीत 5 व 4 एमएम चे खडे होते.

नातेवाइकांच्या सल्ल्यानुसार निरामयचे उपचार मी सुरू केले. पहिले दोन दिवस रिलिफ मिळाला, परंतु नंतर पुन्हा त्रास सुरू झाला. एका नामांकित युरोलॉजिस्टकडे गेल्यावर त्यांनी त्वरित अ‍ॅडमिट होण्याचा सल्ला दिला. अ‍ॅडमिट न झाल्यास किडनी फेल होणे, सूज येऊन इंफेक्शन होणे अशा गोष्टी घडू शकतात असे त्यांनी सांगितले. आम्ही घाबरून अ‍ॅडमिट होण्याचे ठरविले. पण बरोबरीने होणार्‍या त्रासांची माहिती डॉ.चांदोरकरांनाही दिली. त्यांनी मला 5 मिनिटांऐवजी, 10 मिनिटे ट्रीटमेंटसाठी बसण्यास सांगितले. दुपारी चार वाजता ट्रीटमेंट घेतली व अहो आश्चर्यम्! पावणे पाचच्या सुमारास मी लघवीला गेलो असता, काही वेगळी हालचाल जाणवली. थोडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवल्यामुळे तो 11 एमएमचा खडा बाहेर पडताना मी पाहिला. त्यावेळी मला कोणत्याही वेदना झाल्या नाहीत हे विशेष. अ‍ॅडमिट होणेही टळले. तो खडा मी सांभाळून ठेवला आहे.

- श्री. स्वप्निल कोरेअशक्य झाले शक्य!

प्रेग्नन्सीनंतरच्या पहिल्या सोनोग्राफीमध्ये असे लक्षात आले की गर्भाशयाचा आकार छोटा व वेगळा आहे. डॉक्टरांनी सांगितले की त्यामुळे गर्भाची वाढ व्यवस्थित होणार नाही व पुढे जाऊन अडचणी येण्याची दाट शक्यता आहे. आम्हाला कळत नव्हते आता काय करावे ? हे सगळे प्रॉब्लेम्स कोण सोडवू शकेल ?

माझ्या आईने पूर्वी निरामयमध्ये उपचार घेतले होते. ती मला निरामयमध्ये घेऊन गेली. आम्ही डॉ. चांदोरकरांना भेटलो. रिपोर्टस् दाखविले. ते म्हणाले, ‘तुम्हाला काय हवंय?’ आम्ही म्हणालो, ‘सगळं व्यवस्थित व्हायला हवंय’. त्यावर ते म्हणाले की ‘मग आजपासून जे हवंय त्याचा विचार करा. जे नकोय त्याचा विचार करून चुकीच्या विचारांना ऊर्जा देऊ नका. आपण उपचार सुरू करू व पुढच्या सोनोग्राफीमध्ये काय घडतंय ते बघू’.

त्या दिवसापासून निरामयमध्ये स्वयंपूर्ण उपचार सुरू झाले. पुढच्या सोनोग्राफीचा रिपोर्ट अविेश्वसनीय होता. गर्भाशय व्यवस्थित होते. गर्भाची वाढही व्यवस्थित होत होती. सोनोग्राफी करणार्‍यांनाही आश्चर्य वाटले. आम्ही ट्रीटमेंट सुरूच ठेवली. 6 महिन्यांनी गर्भाशय खाली उतरले आणि त्याचे तोंड उघडल्याचे कळले. पण हे देखील पुढच्या सोनोग्राफीमध्ये व्यवस्थित झालेले कळले. नंतर 7-8 महिन्यांतच गर्भजल कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जे 9 असायला हवं ते 3 असल्याचे समजले. पण स्वयंपूर्ण उपचारांदरम्यान आलेली अडचण सांगितली की त्यावर लगेच उपचार सुरू होत असत. त्यामुळे ट्रीटमेंट घेतल्यावर गर्भजल वाढून 11 झाले. डिलेव्हरीच्या वेळीही अशीच अडचण झाली. कळा सुरू झाल्या पण काही घडेना! माझ्या आईने सरांना फोन करून ही गोष्ट सांगितली. त्यांचा फोन झाला आणि पुढच्या अर्ध्या तासातच माझी डिलीव्हरी झाली. डिलीव्हरी नॉर्मल झाली. मला मुलगा झाला. बाळ झाल्यानंतर त्याला कावीळ झाली होती. त्यासाठीही हे उपचार खूप उपयोगी पडले. मला दूध कमी येत होते. त्यामुळे बाळाचे पोट भरत नव्हते. त्यासाठीही हे उपचार उपयोगी पडले. धन्यवाद! …..

- सौ. दिप्ती आचार्यअडथळ्यांची शर्यत जिंकली

8 ऑगस्ट 2011 ला अचानक ओटीपोटात खूप दुखायला लागले. असह्य वेदना होऊ लागल्या. सोनाग्राफी केली तर ओव्हरीमध्ये 56 बाय 59 मि.मि. आकाराचे सिस्ट (गाठ) असल्याचे निष्पन्न झाले. मी अ‍ॅलोपथीक तसेच आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटले. ऑपरेशन करावे लागेल असेच सर्वांचे मत पडले. यात आठवडा निघून गेला. 16 ऑगस्टला केलेल्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये सिस्टचा आकार वाढून 64 बाय 55 मि.मि. झाला होता. मी खूपच घाबरले. या सिस्टची वाढ फारच झपाट्याने होत होती. लगेच डॉ.चांदोरकरांची अपॉइंटमेंट घेतली. व त्यांना भेटून रिपोर्टस् दाखविले. त्या दिवसापासून ट्रीटमेंट सुरू झाली. महिन्यानंतर पुन्हा रिपोर्ट केले. 22 सप्टेंबरला केलेल्या रिपोर्टमध्ये सिस्ट पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसून आले. सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटले.

माझी मासिक पाळीही अनियमित होती, तीही नियमित झाली आहे. यासाठी मला एकही गोळी घ्यावी लागलेली नाही, हे इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते. …..

- कु. प्रगती लेलेऔषधांशिवाय गाठ नष्ट झाली

फेब्रुवारी 2004मध्ये एका छोटेखानी अपघातात माझ्या डाव्या गुडघ्याची लिगामेंट तुटली. तीन महिन्यानंतर लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी केली. परंतु मनात नेहमी शंका-कुशंका निर्माण होतच होत्या. असे का झाले, पुढे आपले काय होणार वगैरे… दरम्यानच्या काळात तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ले झाले, सर्व पॅथींची औषधेही घेतली. परंतु फरक जाणवत नव्हता. सतत एका जागी बसून राहणे अवघड होत होते, प्रचंड स्टिफनेस आला होता आणि त्यामुळेच मला नोकरीही सोडावी लागली.

दरम्यान सकाळमध्ये ‘निरामय’संदर्भातील लेख वाचला. आई-वडिलांच्या सांगण्यावरून काहीशा अनिच्छेनेच मी तेथे गेलो. पण त्यावेळी घेतलेल्या निर्णयाचा आता फायदा झाल्याचे लक्षात येत आहे. तेथील डॉ. कानडे यांनी मला उत्तम प्रकारे समुपदेशन केले. मला जडलेला आजार हा मनो-शारीरिक होता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे माझ्या लक्षात आले.

हळूहळू माझ्यात सुधारणा होत गेली. नजीकच्या काळात याच उपचाराच्या आधारे मी पूर्णपणे बरा होऊन पुन्हा नोकरीवर रुजू होईन, अशी मला खात्री वाटते. …..

- अनामिक प्रतिक्रियामी पुन्हा नोकरी करणार...

टी.बी.साठी घेतलेल्या औषधांच्या दुष्परिणामांमुळे माझी हाडे व स्नायू कमकुवत झाले होते. मला चालायला खूपच त्रास होत होता, पाय ओढतच चालावे लागत होते. माझ्या पायाला नुसतं कोणी स्पर्श जरी केला तरी असह्य वेदना होत होत्या. त्यासाठी हाडांच्या स्पेशालिस्टकडे गेलो. हिप जॉईन्ट बॉल भोवतीचे वंगण संपल्यामुळे ती घासली जात आहे व त्यामुळेच चालायला त्रास होत आहे असे निदान झाले. त्यानंतर संचेतीला 2 वर्षे ट्रीटमेंट घेतली. त्रास तर कमी झाला नाही. कोठारी हॉस्पिटल झाले. सिटीप्राईड झाले. आयुर्वेदिक ट्रीटमेंटची तर गणनाच नाही. कितीतरी कडू औषधे मी सतत घेत होते.

शेवटी ऑपरेशनशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ऑपरेशन केल्यावर देखील रिझल्टस् मिळतीलच याची शाश्‍वती कोणी देत नव्हते. जून 2011 मध्ये निरामयच्या विनाऔषध-विनास्पर्श उपचारांबद्दल कळले. तोपर्यंत 12 वर्षांचा वनवास मी भोगला. संपूर्ण शरीर आणि मन आजारी झाले होते. माझे रिपोर्टस् घेऊन मी सरांना भेटले. मी पूर्ण बरी होऊ शकते हा विश्वास मला तिथे मिळाला व फोनवरून ट्रीटमेंट सुरू झाली. हप्त्याभरातच मला हळू-हळू बरे वाटायला लागले. मी नियमित ट्रीटमेंट घेत होते. हळू-हळू दुखणे पूर्ण थांबले. हिप जॉईन्ट बॉल खराब झाल्यामुळे मी खूप हळू व लंगडत चालत हाते. माझी चाल हळूहळू नॉर्मल व्हायला लागली.

याच दरम्यान प्रेग्नन्सी राहिल्यामुळे काळजी वाढली. कारण खुब्यावर येणारा ताण वाढणार होता. माझा डॉ. चांदोरकरांवर पूर्ण विश्‍वास होता, त्यामुळे मी स्वयंपूर्ण उपचार सुरूच ठेवले. बाळंतपणही व्यवस्थित झाले. कोणतेही त्रास आधी व नंतरही झाले नाहीत. या दरम्यान माझा हर्नियाचा त्रासही बरा झाला. टॉन्सिल्सचा त्रासही बरा झाला. त्यासाठी ऑपरेशन किंवा इतर उपचार घ्यावे लागले नाहीत. 5 मि.मी.चा किडणी स्टोन पूर्णपणे नाहीसा झाला. पित्ताशयाचे खडे विरघळून गेले आणि मी मानसिक रीत्या स्ट्राँग झाले.

आज मी संपूर्ण निरोगी आयुष्य जगत आहे निरामयमुळेच. …..

- सौ. लक्ष्मी गरकळआनंद परत मिळाला

मृत्यूच्या दाढेतून परत येणे काय असते, याचा अनुभव मला ऑक्टोबर महिन्यात आला. 25 ऑक्टोबर 2014 रोजी माझा एक अपघात झाला, त्यावेळी मला काहीच झाले नाही. परंतु काही वेळाने माझ्या कानातून रक्त आले, तरीही मी दुर्लक्ष केले आणि काही वेळातच मी बेशुद्ध पडलो. मेंदूत क्लॉट झाल्यामुळे,  दुसर्‍या दिवशी लगेचच माझ्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये माझी वाचा, दृष्टी, स्मृती जाऊ शकते किंवा उजवी बाजू पॅरलाईज्ड होऊ शकते असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर काही वेळाने माझ्या पत्नीस तुमच्याकडे केवळ 72 तासांचा अवधी असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

आमच्या परिचयातील पावटेकर मॅडमनी माझ्या पत्नीला ‘निरामय’बद्दल सांगितले आणि तिने लगेच माझा फोटो पाठवून फोनवरून ट्रीटमेंट सुरू केली. त्या दिवसापासून हळूहळू सुधारणा होत गेली. पुढील 15 दिवसांनी मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मला ऐकू येते, नीट दिसते आणि उजवी बाजूही व्यवस्थित काम करते. काही हालचालींमध्ये सहजपणा येणे बाकी आहे तसेच थोडा विस्मृतीचा त्रास अजूनही होत आहे. परंतु ‘स्वयंपूर्ण उपचार’पद्धतीच्या आधारे नजीकच्या काळात मी पूर्णपणे बरा होईन, याची मला 100% खात्री आहे.

- श्री. रविचंद्रन मुदलियारमृत्यूच्या दाढेतून परतलो...

एक दिवस वर्तमानपत्र वाचत असताना, निरामयबद्दल माहिती वाचली. तेव्हाच मी माझ्या बोलताना अडखळणे व बेड वेटिंगसाठी उपचार घ्यायचे ठरविले व आईला घेऊन निरामयमध्ये आलो. डॉक्टरांना भेटल्यावर त्यांनी मला सकारात्मक विचार करायला सांगितले व काही महिन्यांतच मी पूर्ण बरा होईन असा विश्‍वास दिला.

माझे उपचार सुरू झाल्यावर पहिल्या पंधरा दिवसातच माझी बेड वेटिंग (अंथरूण ओले करणे) ची सवय संपूर्ण गेली. पुढील सात महिन्यांमध्ये मला न अडखळता बोलताही येऊ लागले. मी 13 वर्षांचा असून, मला ही उपचारपद्धती खूपच आवडली, कारण कोणत्याही औषधाशिवाय कोणताही रोग इथे मुळापासून बरा होतो. …..

मेंदूची कार्यकारिणी बिघडल्यामुळे पार्किन्सन, सेरेब्रल पाल्सी, मोटर न्यूरॉन डिसिज, मल्टिपल स्केलोसिस, मेनिंजायटिस, फिटस् (एपिलेप्स) डायबेटीक न्यूरोपथी, गतिमंदत्व, मतिमंदत्व, डिमेन्शिआ, स्वयंमग्नता (ऑटिझम), स्मृतिभ्रंश, अनियंत्रित हलचाली, कंपवात इ. आजार उद्भवतात. स्वयंपूर्ण उपचारांमुळे मेंदूतील सूक्ष्म पेशी पुनरुत्जीवित करण्याचे काम केले जाते. अनेक आजारांमध्ये दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता असते. कोणताही आजार बरा करण्याची क्षमता या उपचारांमध्ये आहे.

- कु. गीत राकामी औषधांशिवाय बरा झालो

मी नियमित व्यायाम व प्राणायाम करणारी, परंतु चुकीच्या प्राणायामामुळे मला हार्निया झाला. हार्नियासाठी मी डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे सुरू केली. त्या औषधांच्या साईड इफेक्टमुळे मला उष्णता आणि पित्त वाढून मूळव्याधीचा त्रास सुरू झाला. अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी सर्व उपचार झाले. तात्पुरता फरक पडत होात. वेदना थांबविण्याचीच फक्त औषधे घेत आहे असे वाढू लागले. रोजच वेदना आणि अधूनमधून भरीस भर म्हणून शौचावाटे रक्त पण येऊ लागले. जवळपास 5-6 महिने हे दोन्ही त्रास सहन करत होते.

त्यानंतर मे 2012 मध्ये निरामयबद्दल कळले. हे उपचार अतिशय उपयुक्त असल्याने मला महिन्या-दोन महिन्यातच आराम पडला. हार्निया ही जवळपास 50% कमी झाला आहे. त्यामुळे पोट दुखायचेही थांबले आहे. …..

- सौ. मेधा पेशवेअवघड जागेचं दुखणं बरं झालं

मला ‘आयबीएस’चा त्रास होता, बीपी नेहमी वाढलेले असायचे, पाय सतत दुखायचे आणि ‘एंग्झांयटीचा’ही त्रास होताच. जानेवारी 2013 पासून ‘निरामय’मधील डॉ. यशवंत कानडे यांची ट्रीटमेंट चालू केली अन् आज दीड वर्षांनी हळूहळू सर्व त्रास कमी होत आहेत. बीपी आता एकदम र्नॉल असते, पायदुखीही थांबलेली आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ‘आयबीएस’ पासून माझी सुटका झाली आहे. ‘निरामय’ व डॉ. यशवंत कानडे यांच्यामुळे मी आज तणावमुक्त जीवन जगत आहे.

पचनक्रियेतील दोष जसे की, पित्ताचा त्रास, वात विकार (गॅसेस), पोटदुखी, बद्धकोष्ठता, मलावाटे रक्त पडणे, आव पडणे, हेपॅटायटिस, फॅटी लिव्हर, जलोदर, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पित्ताशयातील खडे, अपेंडिक्स, अल्सर, अन्नपदार्थांची अ‍ॅलर्जी इ. सर्व आजार स्वयंपूर्ण उपचारांनी पूर्णपणे बरे होऊ शकतात.

- श्री. प्रमोद गौडतणावमुक्त जीवन जगतोय

मला सन 2005 पासून हायपोथायरॉईडचा खूपच त्रास होता. माझी टीएसएच लेव्हल 67.9 पर्यंत गेली होती. परिणामी प्रचंड वजनवाढ, मानसिक अस्वास्थ्य, कधी डिप्रेशन, चिडचिड होणे इ. एक ना अनेक त्रासांनी मला घेरले होते. खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नव्हते. रोज सकाळी उठले की वाटायचे ‘अरे बापरे ! अजून एक दिवस उजाडला की आपल्या आयुष्यात…..

संपत का नाही हे आयुष्य?’ रात्री झोपताना वाटायचे की ‘उद्याचा दिवस उजाडूच नये’. माझ्या घरातली सर्व माणसे माझ्या ह्या नैराश्याने हैराण झाली होती. सर्व पॅथीजचे उपचार करून झाले. काहीही फायदा झाला नाही.

परंतु एक दिवस वृत्तपत्रातील ‘निरामय’चा लेख वाचला. उत्सुकता निर्माण झाली. पण विेशास बसत नव्हता. सायन्सची विद्यार्थिनी असल्याने प्रत्येक गोष्टीत खोलात जायची सवय होती. ‘सिक्रेट’ सिनेमा पाहिल्यानंतर माझा एनर्जी डायनॅमिक्सचा अभ्यास चालू झाला. खूप अभ्यास झाल्यानंतर मी ‘निरामय’मधील डॉक्टरांशी संपर्क साधला. थोड्याशा अविश्‍वासानेच हे उपचार सुरू केले. आश्चर्यकारक रीत्या 15 दिवसांतच माझे नैराश्य बर्‍याच प्रमाणात कमी झाले. मला आतून शांत वाटू लागले. माझ्यातील हा बदल माझ्यासह कुटुंबीयांसाठीही सुखावह होता. मी उपचार पुढे चालू ठेवले आणि काही महिन्यातच माझे सर्व मेडिकल रिपोर्टस् नॉर्मल आले. हळूहळू वजनदेखील कमी होत होते. सहा महिन्यांत जवळजवळ 10 किलो वजन कमी झाले आहे.

माझ्या आयुष्याचा कायापालट करणार्‍या सर्व डॉक्टरांचे आभार ! …..

- सौ. मनिषा लवाटनिराशेच्या गर्तेतून बाहेर आले

ऑगस्ट 2009 पासून अचानकच मला व्हर्टीगोचा त्रास सुरू झाला. अधून-मधून डोकं जड होत होतं. पुढे-पुढे चक्कर यायला लागली व कानातून बारीक आवाज येऊ लागला. उलट्या होऊ लागल्या. पल्स रेट वाढत होता. सर्व टेस्ट झाल्या. सगळे रिपोर्टस् नॉर्मल आले. डॉक्टरांना निदान करता येईना. औषधं सुरू झाली. पण फरक पडेना – हळूहळू चक्कर वाढून तोल जाऊ लागला. कानातले आवाजही वाढले. तुमचे सर्व दुखणे मानसिक आहे असा शिक्का डॉक्टरांनी मारला. औषधं बदलली. डॉक्टर बदलले, आयुर्वेदिक/ होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली. पण प्रॉब्लेम जागीच राहिला.

शेवटी चालणंही बंद झालं. उठून उभं राहिलं की आजूबाजूचं सगळं फिरायला लागायचं. कानातल्या आवाजामुळे तर मी अगदी बेजार झाले होते. जरा जरी मान हलवली तरी आता चक्कर येत होती. डोळे मिटले तरी गरगरत होते. माझी झोपच उडाली होती. मी मनातून झुरायला लागले होते.

विश्रांतीसाठी म्हणून जानेवारी 2010 मध्ये मी माहेरी (पुण्यात) आले. आमच्या ओळखीच्यांकडून मला स्वयंपूर्ण उपचारांबद्दल समजले. मला त्यांचा अनुभव ऐकून आशा वाटली व मी उपचार सुरू केले. पहिल्याच दिवशी मी सलग  दोन तास झोपू शकले. त्यामुळे शरीराचा ताण थोडासा कमी झाला. हळूहळू मी एकटी उभी राहू शकले. चक्कर कमी झाल्यामुळे आता मी खोलीबाहेर पडून हॉलमध्ये येऊ लागले. घरच्यांबरोबर हसू-बोलू लागले. कानातले आवाजही हळूहळू कमी होत गेले.

गेल्या सहा महिन्यात माझं अस्तित्वच विसरलेली मी, आता परत माणसांत येऊ लागले. या सर्व डेव्हलपमेंट होण्यासाठी एक महिना सलग ट्रीटमेंट घ्यावी लागली. माझ्या अनुभवावरून मी सांगू शकते की ही एक अतिशय प्रभावी उपचार पद्धत आहे. …..

- सौ. अनुपमा गलगलीप्रभावी व परिणामकारक उपचार

गेले 2 वर्षांपासून लघवीस प्रचंड त्रास (युरिन ब्लॉकेज) होत असे. त्यासाठी दर महिन्याला एकदा युरिन पासिंगची ट्रीटमेंट कायम स्वरूपी मागे लागलेली. रोजच्या 5-7 गोळ्या आणि महिन्याला 3-4 वेळेस दवाखाना. मात्र दुखणे जैसे थे. मानसिक रीत्याही मी खूप खचायला लागले होते.

विनाऔषध उपचार करणार्‍या निरामयमधील डॉ. कानडे यांनी घरी येऊन उपचार सुरू केले. तो दिवस होता 22 फेब्रुवारी 2012. पुढे फोनद्वारे उपचार घेतले. मी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सातत्याने आणि विेश्वासाने उपचार घेत होते. पहिल्या दिवसापासून काहीसा फरक जाणवू लागला. त्यामुळे आणखी विश्वास वाढला. 2 महिन्यांत लघवीस होणार्‍या त्रासात चांगलीच सुधारणा झाली. मुख्य म्हणजे इतर औषधे आणि डॉक्टरांकडे जाणे थांबले. आता मला पूर्ण बरे वाटत आहे.

डॉ. कानडे व निरामय परिवाराचे शतशः आभार ! …..

- श्रीमती अंजना बेसकेऔषध-गोळ्यांतून सुटका झाली

माझं लग्न तसं उशिराच झालं. तीन वर्षांनंतर मला दिवस राहिले. सुरुवातीला कोणताच त्रास नव्हता, परंतु चौथ्या महिन्यानंतर मला काही कारणास्तव 21 स्क्रिनिंग टेस्ट कराव्या लागल्या, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या टेस्टनुसार शंभरातील एखादी केस अ‍ॅबनॉर्मल असू शकते व मी चाळिशी ओलांडल्याने होणारे बाळ अ‍ॅबनॉर्मल होऊ शकते असे डॉक्टरांनी सांगितले.

आम्ही थोडाही वेळ न दवडता ‘निरामय’च्या डॉ. चांदोरकर यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला धीर तर दिलाच पण त्यांच्या समुपदेशनामुळे आमच्या सर्व शंका व काळज्याही दूर झाल्या. तेव्हापासून पूर्ण विश्‍वासाने मी स्वयंपूर्ण उपचार सुरू केले. टेस्टमधे जाणवणारे दोष मी लगेच चांदोरकर सरांना सांगत होते. सातव्या महिन्यात प्लासेंटा खूप खाली आल्याचे सोनोग्राफीमध्ये कळले व बाळाचे वजनही खूपच कमी असल्याने चिंतेचे कारण निर्माण झाले. पण स्वयंपूर्ण उपचारांमुळे पुढच्याच सोनोग्राफीमध्ये बाळाचे वजन दीड किलोने वाढले व प्लासेंटा जागेवर आल्याचे दिसून आले.

वाचताना आश्‍चर्य वाटेल पण या संपूर्ण ट्रीटमेंटच्या दरम्यान मी कोणतेही औषध घेतलेले नाही. ‘स्वयंपूर्ण उपचारां’च्या आधारे माझी ‘डिलिव्हरी’ही नॉर्मल झाली आणि आज मला छानशी गोड मुलगी आहे. येत्या जानेवारी 2015 ला तिला दोन वर्ष पूर्ण होतील. डॉ. चांदोरकरांची व संपूर्ण निरामय परिवाराची शतश: आभारी आहे……

- सौ. समृद्धी शहाआणि मला छानशी मुलगी झाली!

माझ्या आयुष्यात एक नाही, दोन नाही तर तब्बल 18 वर्षं एक समस्या घर करून होती आणि ती समस्या ‘मानसिक भीती’ची होती. सुारे अठरा वर्षांपूर्वी मी गरोदर असताना माझी परिस्थिती जरा नाजूक होती. पती व्यवसायाच्या कामात व्यस्त असल्याने मी घरात एकटीच असायचे. त्यावेळी मला टीव्ही पाहण्याची खूप सवय जडली होती. तेव्हा एका टीव्ही मालिकेतील प्रत्येक भागात कोणाचा तरी मृत्यू व्हायचा; मग त्यासंदर्भाने रडारड, अंत्यविधीची तयारी या सर्व गोष्टी दाखवल्या जायच्या. त्याच दरम्यान आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये दोघांचे मृत्यू झाले आणि ते सर्व दृश्य मी आमच्या खिडकीतून पाहिले. तेव्हापासून माझ्या मनात मृत्यूबद्दल प्रचंड भीती बसली.

मला नेहमी वाटायचे, आपलाही मृत्यू होणार आहे. आपलेही अंत्यकार्य असेच पार पडणार आहे. मृत्यूची भीती माझ्या मनात चोवीस तास घर करून राहिली होती. एकीकडे संसाराचे सर्व सोपस्कार सुरू होते. परंतु दुसरीकडे मनातील मृत्यूचे थैमान कमी होत नव्हते. माझी परिस्थिती केवळ माझे पतीच समजू शकत होते. त्यांनी मला मानसोपचार तज्ज्ञांनाही दाखविले, परंतु माझ्या मनातील भीती काही केल्या कमी होईना.

पती, मुलं यांच्याविषयीची माझी सर्व कर्तव्यं मी पार पाडत होते, पण मी स्वत: कोणताही आनंद घेऊ शकत नव्हते. जीवनात आनंद उरलाच नव्हता, उरला होता तो फक्त मृत्यू! अशातच एक दिवस मालती मराठे यांचा ‘निरामय’संदर्भातील लेख मुक्तपीठमध्ये वाचनात आला आणि नव्या उमेदीने व आशेने मी डॉ. चांदोरकर यांच्याकडे गेले.

पहिल्या 2-3 उपचारांमुळेच माझ्यात थोडा आत्मविश्‍वास जागरूक झाला. ‘तुम्ही पूर्ण बर्‍या व्हाल’ असं म्हणणारे एकमेव डॉक्टर मला माझ्या आयुष्यात भेटले, ते म्हणजे डॉ. योगेश चांदोरकर. मी सातत्याने त्यांची ट्रीटमेंट घेत राहिले आणि प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये मला भयमुक्त करण्यासाठी डॉ. योगेश यांनी शंभर टक्के प्रयत्न केले. एक दिवस मला रात्री 10.30 वाजता खूप त्रास होत होता म्हणून डॉ. योगेश यांना फोन केला. त्यांनी मला ट्रीटमेंट दिली अन् मला शांत झोप लागली. सकाळी उठल्यावर लक्षात आले की, आपल्याला भीती वाटत नाहीये. मी पुन्हा पुन्हा तपासून पाहिले पण, मी अक्षरश: भयमुक्त झाले होते. माझा आणि माझ्या पतींचा यावर विश्‍वासच बसेना, पण हेच सत्य होते.

तब्बल 18 वर्षं जे ‘भय’ मनात घेऊन मी वावरत होते, ते ‘भय’डॉ. चांदोरकर यांनी अवघ्या दोन महिन्यांच्या ट्रीटमेंटनी दूर केले आणि विशेष म्हणजे कोणत्याही औषधाशिवाय. आज मी पुन्हा माझ्या जीवनातील सौंदर्य अनुभवत आहे. ‘निरामय’ आणि डॉ. चांदोरकर यांचे आभार मानण्यासाठी शब्द अपुरे पडतील, पण मी खरोखरच त्यांची शतश: आभारी आहे. …..

- अनामिक प्रतिक्रिया ‘भय’ इथले संपले!