Home

 

सर्वे सन्तु निरामयः।

‘निरामय म्हणजे संपूर्ण आरोग्य’. W. H. O. अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवरील स्वास्थ्याची भावना म्हणजे आरोग्य, असे आरोग्य मिळविण्यासाठी गरज असते संपूर्ण शरीरस्वास्थ्य, मनस्वास्थ्य आणि वैचारिक प्रगल्भतेची आणि असे निरामय जीवन सगळ्यांना मिळावे यासाठीच निर्माण झाले ‘स्वयंपूर्ण उपचार’. विनाऔषध, विनास्पर्श तरीही अत्यंत प्रभावी अशी हि उपचारपद्धती. सप्तचक्र व पंचतत्वांवर केले जाणारे हे उपचार संपूर्णतः निसर्गोपचार व योगशास्त्रावर आधारित असून याद्वारे कोणताही आजार वैश्विक ऊर्जा वापरून बरा केला जाऊ शकतो.
गरज हि शोधाची जननी असते असे म्हणतात, अशाच गरजेतूनच उत्पत्ती झाली या उपचारपद्धतीची.

 
 

स्वयंपूर्ण उपचार पद्धती

‘स्वयंपूर्ण’ म्हणजे प्रत्येकातील ‘स्वयं’ला पूर्णत्वाकडे नेण्याची प्रक्रिया… पूर्णत्व म्हणजे केवळ रोगमुक्ती नाही तर ती आहे आनंदाची अनुभूती. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शरीर व मन दोन्हीही सशक्त व निरोगी असेल.

माणसाचे अस्तित्व हे तीन स्तरांमध्ये आहे शरीर, ऊर्जा व मन. ऊर्जा हा शरीर व मनातील दुआ आहे. शरीरामध्ये घडणारा प्रत्येक बदल हा उर्जेमार्फतच मनामध्ये परावर्तित होत असतो, तर मनात येणारा प्रत्येक विचार ऊर्जामार्फतच शरीरापर्यंत पोहोचत असतो. स्वयंपूर्ण उपचार नेमके याच ऊर्जेवर कार्य करतात. शरीर म्हणजे आपणास फक्त भौतिक शरीर माहिती असतो, परंतु या स्थूल शरीराबाहेर एक सूक्ष्म/ऊर्जाशरीरदेखील असते. या ऊर्जाशरीराने आपले संपूर्ण भौतिक शरीर आच्छादलेले असते. कोणताही दोष सूक्ष्म शरीरामध्ये अडविला जातो. परंतु वारंवार होणाऱ्या आघातामुळे सूक्ष्म शरीर अशक्त होऊन त्याचा दुष्परिणाम भौतिक शरीरावर दिसू लागतो. आधुनिक वैद्यक शास्त्रात फक्त भौतिक शरीराचा विचार करून उपचार केले जातात त्यामुळे सूक्ष्म शरीरामधील दोष तसेच राहण्याची शक्यता असते. स्वयंपूर्ण उपचार त्या ऊर्जादेहातील दोष घालवण्यासाठी कार्यरत असतात ज्यामुळे रोगाचे समूळ उच्चाटन होऊ शकते.